फेसबूकवर 'फुंगसुक वांगडू'ने घातला 3 हजार 700 कोटींचा गंडा

By admin | Published: February 6, 2017 10:52 AM2017-02-06T10:52:28+5:302017-02-06T11:51:09+5:30

फेसबूकवर पोस्ट लाईक करा आणि 5 रुपये मिळवा अशी स्कीम सुरु करत तब्बल सात लाख लोकांना 3 हजार 700 कोटींचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे

Facebook 'Fungusuk Wangdoo' pays Rs 3,700 crore | फेसबूकवर 'फुंगसुक वांगडू'ने घातला 3 हजार 700 कोटींचा गंडा

फेसबूकवर 'फुंगसुक वांगडू'ने घातला 3 हजार 700 कोटींचा गंडा

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकवर पोस्ट लाईक करा आणि प्रत्येक लाईक मागे 5 रुपये मिळवा अशी स्कीम सुरु करत तब्बल सात लाख लोकांना 3 हजार 700 कोटींचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एसटीएफने कंपनीचा मालक अनुभव मित्तलला अटक केल्यानंतर या महाघोटाळ्याचा खुलासा झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार नोएडामधून लोकांना गंडा घालण्याचा हा प्रकार चालू होता. आपण फसवले गेलो असल्याची माहिती मिळाल्यानंतर हजारो लोकांनी कंपनीच्या बाहेर जमा होऊन गोंधळ घातला. 
 
गुरुवारी पोलिसांनी कंपनीचा मालक अनुभव मित्तल, सीईओ श्रीधर आणि टेक्निकल हेट महेश दयालला अटक केली आहे. कंपनीचा मालक 26 वर्षीय अनुभव मित्तला ऐशोआरामात जगण्याची लालसा आहे. अनुभव मित्तल हा गाझियाबाद जवळच्या पिलखुआ या छोट्या गावातला रहिवासी आहे. त्याची हुशारी पाहून कॉलेजमध्ये मित्र त्याला ‘3 इडियट्स’च्या फुंगसुक वांगडूची उपमा द्यायचे. 2010 मध्ये इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षातच त्यानं कंपनी सुरु केली. अनुभवने पत्नी आयुषी मित्तललाही या कंपनीची संचालक केलं. हा महाघोटाळा समोर आल्यानंतर तिन्ही आरोपी परदेशी पळून जाण्याच्या तयारीत होते. 
 
या घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी कंपनीचा मालक अनुभव मित्तलसहित तिघांना अटक केली आहे. श्रीधर प्रसाद आणि महेश दयाल अशी इतर दोघांची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सदस्य झाल्यानंतर कंपनी ग्राहकांना त्यांच्या स्मार्टफोनवर एक लिंक पाठवायची. ही लिंक लाईक केल्यास कंपनी पाच रुपये द्यायची. मात्र काही दिवसांनी कंपनीने ग्राहकांना पैसे देणं बंद केलं. या स्कीममध्ये गुंतवणूकदारांकडून 5 हजार 750 रुपये ते 57 हजार 500 रुपयांची गुंतवणूक करुन घेतली जायची. 
 
एसटीएफने दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपुर्वी त्यांना या महाघोटाळ्याची माहिती मिळाली होती. कंपनी वेबसाईटच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना घरबसल्या पैसे कमवण्याचं अमिष दाखवत होती. काही लोकांची फसवणूक झाल्यानंतर त्यांनी सुरजपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली, त्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली.  
 
सेक्टर-63 मधील अब्लेज सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कंपनीचं कार्यालय आहे. ही कंपनी आधी सोशलट्रेड. बिज ऑनलाइन पोर्टवरुन ऑपरेट केली जात होती. त्यानंतर हे नाव बदलून  डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड करण्यात आलं होतं. 
 
अंमलबजावणी संचालनालयाने रविवारी अनुभव मित्तलवर गुन्हा दाखल करुन त्याच्या नोएडा, गाझियाबाद आणि कानपूरमधील पाच ठिकाणांवर छापा टाकला आहे. या छाप्यात कोट्यवधींच्या संपत्तीचे कागदपत्र मिळाल्याचं कळतं. आता ईडी अनुभवची संपत्ती जस्त करण्याच्या तयारीत आहे. जेणेकरुन ज्या लोकांचे पैसे गुंतले आहेत, ते बाहेर काढता येईल.
 
कंपनीची 12 खाती - 
या कंपनीचे चार खासगी बँकांमघ्ये 12 खाती आहेत, ज्यामध्ये 500 कोटीहून अधिक रक्कम जमा असल्याचं तपासात समोर आलं आहे. एसटीएफ सध्या कंपनीच्या गुंतवणूकीची माहिती मिळवत असून ज्या खात्यांमध्ये ही रक्कम ट्रान्सफर करण्यात आली त्यांचाही तपास करत आहे. 
 
अनुभवच्या समर्थनार्थ ऑनलाईन पोल!
दुसरीकडे ‘सोशलट्रेडडॉटबीज’वर पैसा लावणारे लोक आरोपी अनुभव मित्तलच्या समर्थनार्थ उतरले आहेत. यासाठी लोकांनी ऑनलाईन पोल सुरु केला आहे. 
 
 
 

 

Web Title: Facebook 'Fungusuk Wangdoo' pays Rs 3,700 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.