IITच्या विद्यार्थ्याला दीड कोटींचे पॅकेज फेसबुकने दिली आॅफर

By admin | Published: December 3, 2014 06:12 AM2014-12-03T06:12:40+5:302014-12-03T08:47:44+5:30

आयआयटी खरगपूरच्या एका विद्यार्थ्याला फेसबुकने वार्षिक १़५४ कोटी रुपयांच्या गलेलठ्ठ वेतन पॅकेजचा प्रस्ताव दिला आहे़ कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आयआयटी विद्यार्थ्यांना मिळालेली

Facebook has given a package of one crore to IIT student | IITच्या विद्यार्थ्याला दीड कोटींचे पॅकेज फेसबुकने दिली आॅफर

IITच्या विद्यार्थ्याला दीड कोटींचे पॅकेज फेसबुकने दिली आॅफर

Next

कोलकाता : आयआयटी खरगपूरच्या  एका विद्यार्थ्याला फेसबुकने वार्षिक १़५४ कोटी रुपयांच्या गलेलठ्ठ वेतन पॅकेजचा प्रस्ताव दिला आहे़ कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आयआयटी विद्यार्थ्यांना मिळालेली ही सर्वात मोठी आॅफर आहे़ तूर्तास फेसबुकने १़५४ कोटी रुपयांचे वेतन देऊ केलेल्या विद्यार्थ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे़
आयआयटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी कॅम्पस प्लेसमेंटच्या पहिल्या दिवशी २७ कंपन्यांनी १६३ विद्यार्थ्यांना नोकरीचा प्रस्ताव दिला़ फेसबुकचा प्रस्ताव यापैकीच एक आहे़
खरगपूर आयआयटीच्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या देशांतर्गत पॅकेजमध्ये सर्वाधिक ४२ लाख रुपयांचे आहे, तर विदेशी कंपन्यांमध्ये सर्वाधिक पॅकेज १ कोटी ५४ लाख रुपयांचे आहे़ आयआयटी कानपूरमध्ये पहिल्याच दिवशी सर्वाधिक ६० लाख रुपयांच्या वार्षिक वेतनाचा प्रस्ताव दिला गेला़ बहुतांश विद्यार्थ्यांना
४५ ते ६० लाख रुपयांचे पॅकेज
मिळाले़ सर्वाधिक ३८ विद्यार्थ्यांना ईएक्सएल सर्व्हिसेसने गलेलठ्ठ पगाराचे प्रस्ताव दिले़

Web Title: Facebook has given a package of one crore to IIT student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.