नव्या मतदारांच्या नोंदणीसाठी निवडणूक आयोग घेणार फेसबूकची मदत

By admin | Published: June 28, 2017 10:04 PM2017-06-28T22:04:56+5:302017-06-28T22:05:06+5:30

मोबाइल सेवेच्या प्रगतीबरोबरच आपल्या देशात फेसबुकचा वापर करणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे आता चक्क नव्या मतदारांच्या

Facebook help to elect new voters | नव्या मतदारांच्या नोंदणीसाठी निवडणूक आयोग घेणार फेसबूकची मदत

नव्या मतदारांच्या नोंदणीसाठी निवडणूक आयोग घेणार फेसबूकची मदत

Next
>ऑनलाइन लोकमत  
नवी दिल्ली, दि. 28 - फेसबुकवरील अकाऊंट हे आता वास्तव जगातील व्यक्तीचे व्हर्चुअल जगातील अपरिहार्य अस्तित्व बनले आहे. मोबाइल सेवेच्या प्रगतीबरोबरच आपल्या देशात फेसबुकचा वापर करणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे आता चक्क नव्या मतदारांच्या नाव नोंदणीसाठी निवडणूक आयोगाने फेसबूकवर विशेष अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी फेसबूकच्या मदतीने मतदार नोंदणीसाठी रिमाइंडर सुरू करण्यात येईल. अधिकृत माहितीनुसार १ जुलैपासून मतदान करण्यास योग्य असलेल्या व्यक्तींना मतदार नोंदणी रिमाइंडर पाठवण्यात येणार आहे. 
 निवडणूक आयोगाच्या या पावलामुळे फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियावर सातत्याने व्यक्त होणाऱ्यांना मतदार नावनोंदणी आणि मतदानासाठी प्रोत्साहित करणे शक्य होणार आहे. भारतातील भाषिक विविधता विचारात घेऊन हा रिमाइंडर इंग्रजी, हिंदी, गुजराती, तामिळ तेलुगू, मल्याळम, कन्नड, बंगाली, उर्दु, आसामी, मराठी आणि उडिया या भाषांमध्ये पाठवण्यात येईल. फेसबूकवरील अलर्टवरील रजिस्टर नाऊ या बटणावर क्लिक केल्यानंतर नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टलचे पेज ओपन होईल. जिथे संबंधितांना नोंदणीची प्रक्रिया समजावून सांगितली जाईल.  
दरम्यान, या संकल्पनेबाबत मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसीम झैदी यांनी समाधान व्यक्त केले आहे.  निवडणूक आयोगाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी हे एक पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच मतदान करण्यास पात्र असलेल्या सर्व नागरिकांना त्यांनी मतदार नावनोंदणी करण्याचे आवाहनही केले आहे.  

Web Title: Facebook help to elect new voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.