फेसबुक, इन्स्टाग्राम जगभरात ठप्प, ट्विटरवरून नेटीझन्सनं काढले टिमटे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 10:58 PM2017-10-11T22:58:23+5:302017-10-11T22:59:30+5:30

जगभरात काही वेळासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइट अचानक ठप्प झाल्या होत्या. यावेळी फेसबुकवर फोटो पोस्ट होत नव्हते शिवाय कुठलंही स्टेटस अपडेट होत नव्हतं.

Facebook, Instagram crawl worldwide, Netflix removed Twitter from Twitter | फेसबुक, इन्स्टाग्राम जगभरात ठप्प, ट्विटरवरून नेटीझन्सनं काढले टिमटे

फेसबुक, इन्स्टाग्राम जगभरात ठप्प, ट्विटरवरून नेटीझन्सनं काढले टिमटे

Next

नवी दिल्ली - जगभरात काही वेळासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइट अचानक ठप्प झाल्या होत्या. यावेळी फेसबुकवर फोटो पोस्ट होत नव्हते शिवाय कुठलंही स्टेटस अपडेट होत नव्हतं. फेसबुक डेस्कटॉप आणि मोबाइल या दोन्ही ठिकाणी काम करत नव्हते. एवढचं नव्हे तर फोटो शेअर करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इन्स्टाग्रामचीही अशी परिस्थिती होती. पण काही कालावधीनंतर दोन्ही सोशल साइट्स सुरळीतपणे सुरू झाल्या होत्या.

फक्त भारतातच नव्हे तर अमेरिका, ब्रिटनसह जगभरातील अनेक देशांमध्ये फेसबुक ठप्प झाल्याचे वृत्त आले. अनेक युजर्सचे फेसबुक पेज लोडच होत नव्हते. तर काहींना आपलं अकाउंट लॉग इन आणि लॉग आऊट करण्यात अडचणी येत होत्या. यामुळे मोबाइल आणि डेस्कटॉप स्क्रिनवर वेगवेगळे मेसेज येत होते. फेसबुक सुरू केल्या 'फेसबुक लवकर सेवेत येणार' असा मॅसेज येत होता. यादरम्यान, ट्विटरवरून युजर्सनी फेसबुकला चिमटेही काढले..


 


 


 


 


Web Title: Facebook, Instagram crawl worldwide, Netflix removed Twitter from Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.