फेसबूकने आणली "वाय-फाय एक्स्प्रेस", बिनधास्त वापरा इंटरनेट

By admin | Published: May 5, 2017 08:59 AM2017-05-05T08:59:37+5:302017-05-05T09:01:40+5:30

फेसबूकने आपल्या या नव्या योजनेसाठी दूरसंचार कंपनी एअरटेलसोबत हातमिळवणी केली आहे

Facebook launches "Wi-Fi Express", Use BindThat Internet | फेसबूकने आणली "वाय-फाय एक्स्प्रेस", बिनधास्त वापरा इंटरनेट

फेसबूकने आणली "वाय-फाय एक्स्प्रेस", बिनधास्त वापरा इंटरनेट

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - सोशल मीडिया नेटवर्क कंपनी फेसबूकने आपल्या ‘वाय-फाय एक्सप्रेस ’ सेवेचा गुरुवारी भारतात शुभारंभ केला. या सेवेअंतर्गत फेसबूक ग्रामीण भागातील लोकांना सार्वजनिक हॉटस्पॉटच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे. फेसबूकने आपली वादग्रस्त "फ्री बेसिक्स" सेवा बंद केल्याच्या जवळपास एक वर्षानंतर ही नवी सेवा सुरु केली आहे. 
 
"फ्री बेसिक्स" मध्ये काही निवडक वेबसाईट्सवर मोफत पोहोचण्याची सुविधा होती. मात्र वाय-फाय एक्सप्रेस पेड मॉडल असणार आहे. यामध्ये इंटरनेट काही ठराविक वेबसाईट्सपुरतं मर्यादित नसणार आहे. सार्वजनिक हॉटस्पॉटची सेवा घेण्यासाठी लोकांना दैनिक, साप्ताहिक किंवा मासिक डाटा पॅक खरेदी करावा लागणार आहे. त्यानंतरच हॉटस्पॉटशी कनेक्ट करणं शक्य होणार आहे. 
 
फेसबूकने आपल्या या नव्या योजनेसाठी दूरसंचार कंपनी एअरटेलसोबत हातमिळवणी केली आहे. कंपनी पुढील काही महिन्यात 20 हजाराहून अधिक वाय-फाय हॉटस्पॉट सुरु करणार आहे. फेसबूक आशिया-पॅसिफिकचे कनेक्टिव्हीटी सोल्यूशन्स प्रमुख मुनीष सेठ यांनी सांगितलं आहे की, "भारताची लोकसंख्या तब्बल 130 कोटी आहे. मात्र फक्त 39 कोटी लोक इंटरनेट वापरतात. एक्स्प्रेस वाय-फायच्या माध्यमातून समाजातील अशा लोकांपर्यंत पोहोचण्याचा फेसबूकचा प्रयत्न आहे जे अद्यापही इंटरनेट सेवेपासून वंचित आहेत". 
 
फेसबूकची ही वाय-फाय एक्स्प्रेस सेवा उत्तराखंड, गुजरात, राजस्थान आणि मेघालयात तब्बल 700 हॉटस्पॉटच्या माध्यमातून उपलब्ध आहे.
 

Web Title: Facebook launches "Wi-Fi Express", Use BindThat Internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.