फेसबुकनं उघडलं 'लोकल मार्केट', सामान खरेदी-विक्री करण्याची सुविधा
By admin | Published: October 4, 2016 06:18 PM2016-10-04T18:18:01+5:302016-10-04T18:36:27+5:30
सोशल मीडियावरची आघाडीची कंपनी फेसबुकनंही ऑनलाइन 'मार्केटप्लेस' ही सुविधा सुरू केली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4- सोशल मीडियावरची आघाडीची कंपनी फेसबुकनंही ऑनलाइन 'मार्केटप्लेस' ही सुविधा सुरू केली आहे. मार्केटप्लेसच्या माध्यमातून तुम्हाला कोणतंही सामान खरेदी अथवा विक्री करता येणार आहे. प्लिप कार्ट, अॅमेझॉन, स्नॅपडील सारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी फेसबुकनं ही सुविधा उपलब्ध करून दिल्याची आता चर्चा आहे.
फेसबुकनं एका पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'मार्केटप्लेस'मुळे फेसबुकच्या युजर्सना खरेदी-विक्री करणं सोपं जाणार आहे. मार्केटप्लेस ही सुविधा लवकरच अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या देशांमधल्या अॅपल आणि अँड्रॉइड मोबाईल धारकांसाठी उपलब्ध करून देण्याचा फेसबुकचा विचार आहे. फेसबुकच्या माहितीनुसार, 45 कोटी लोक प्रत्येक महिन्याला फेसबुकला भेट देत असून, 'मार्केटप्लेस'द्वारे वस्तू खरेदी आणि विक्रीही करतात.
फेसबुकवर मार्केट प्लेसच्या आयकॉनला क्लिक केल्यावर ई-कॉमर्स साइटवर विकल्या जाणा-या सर्व वस्तू पाहायला मिळतात. यूजर्सला जी वस्तू विकायची आहे त्याला तो टॅब करेल, या वस्तूचा फोटो आणि डिस्क्रिप्शन टाकल्यानंतर ती वस्तू मार्केटप्लेसमध्ये ग्राहक विकू शकतो, अशी सुविधा फेसबुककडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.