जम्मू काश्मीरमधील फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटरवरील बंदी हटवली
By admin | Published: May 27, 2017 11:33 AM2017-05-27T11:33:29+5:302017-05-27T11:33:29+5:30
जम्मू काश्मीरमध्ये जवळपास महिन्याभरापासून सोशल मीडिया वापरावर लावण्यात आलेली बंदी हटवण्यात आली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 27 - जम्मू काश्मीरमध्ये जवळपास महिन्याभरापासून सोशल मीडिया वापरावर लावण्यात आलेली बंदी हटवण्यात आली आहे. राज्य सरकारनं फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि ट्विटरसहीत जवळपास 22 सोशल मीडिया साइट्सच्या वापरावर बंदी आणली होती.
एका अधिका-यानं दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 8.30 वाजण्याच्या दरम्यान सोशल मीडिया वापरावरील बंदी हटवण्यात आली.
दहशतादी कारवाई आणि अफवांवर रोख आणण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं ही कारवाई केली होती. पण ही कारवाई परिणामकारक ठरल्याचं दिसून आलं नाही कारण या बंदीदरम्यान येथील जनता वीपीएन (वर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क)चा वापर करत असल्याची बाब समोर आली आहे.
J&K govt lifts ban on social networking sites; govt had banned 22 social media platforms including Facebook, WhatsApp & Twitter till May 26
— ANI (@ANI_news) May 27, 2017