फेसबुकचे ‘स्मरण’खाते झाले हिट
By admin | Published: November 14, 2016 01:26 AM2016-11-14T01:26:16+5:302016-11-14T01:26:16+5:30
शनिवारी अचानक कोट्यवधी लोकांच्या मृत्यूचा संदेश त्याच्या फे्रण्ड्सना पाठवून फेसबुकने पाठवून स्वत:चे अडगळीत पडलेले आॅप्शन साऱ्या जगाला माहीत करून दिले आहे.
मुंबई : शनिवारी अचानक कोट्यवधी लोकांच्या मृत्यूचा संदेश त्याच्या फे्रण्ड्सना पाठवून फेसबुकने पाठवून स्वत:चे अडगळीत पडलेले आॅप्शन साऱ्या जगाला माहीत करून दिले आहे. हे आॅप्शन म्हणजे फेसबुकवरचे तुमचे स्वत:चे (युजर) ‘स्मरण’खाते. म्हणजेच मेमोरिअलाइज्ड अकाउंट. फेसबुकचा सहसंस्थापक मार्क झुकेरबर्गही स्वत:ही साऱ्या प्रकारात ‘मृत्यू’ पावल्याची बातमी पसरली होती.
एखाद्या फेसबुक युजरचा मृत्यू झाल्यानंतरही जर त्याला आपले फेसबुक खाते सुरू राहावे असे वाटत असेल तर त्याला त्यासाठी नॉमिनी जाहीर करावा लागतो. असा व्यक्ती मग फेसबुकला त्या व्यक्तीच्या निधनाची माहिती देते. मग मृत व्यक्तीचे फेसबुख खाते मेमोरिअलाइज्ड अकाउंट म्हणून सुरू राहते. हे अकाउंट त्या व्यक्तीच्या स्मराणार्थ असते.
या अशाच पर्यायाला जगाला विसर पडला होता. त्यामुळे कदाचित स्वत:च फेसबुकने जवळपास कोट्यवधी लोकांचे अकाउंट मेमोरिअलाइज्ड करून टाकले, असा संशय काही सोशल मीडिया तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
या मेमोरिअलाइज्ड अकाउंटच्या पर्यायामध्ये ‘बग’ म्हणजेचे खराबी आल्याने हा सगळा प्रकार
घडला आणि त्याबद्दल फेसबुकने दिलगिरीही व्यक्त केली. परंतु, या प्रकारानंतर जगभरातील कोट्यवधी फेसबुक युजर्सना ते हयात असतानाच स्वत:च्या मृत्यूची बातमी मिळाली होती. शनिवारी जगभर याचीच चर्चा होती. (वृत्तसंस्था)