फेसबुकसाठी महिलेची आत्महत्या
By Admin | Published: October 14, 2015 04:28 PM2015-10-14T16:28:32+5:302015-10-14T16:28:32+5:30
केरळमधील कोईबंतूरमध्ये एका नवविवाहित महिलेने मोबाइलवर फेसबुक आणि व्हॉट्सअॅपचा वापर करण्यास पतीने मनाई केल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
ऑनलाइन लोकमत
कोईबंतूर, दि. १४ - केरळमधील कोईबंतूरमध्ये एका नवविवाहित महिलेने मोबाइलवर फेसबुक आणि व्हॉट्सअॅपचा वापर करण्यास पतीने मनाई केल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
अपर्णा असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून ती आपल्या पतीसह कोईबंतूरमधील गौनंदमपालयम् परिसरात आपल्या पतीसह राहत होती. तिचा पती कुमार हा ट्रक चालक असल्याने तो नेहमी बाहेरगावी असायचा. त्यामुळे ती घरी एकटीच असल्याने नेहमी मोबाइवर फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर गुंतलेली असायची. विशेष म्हणजे कुमार हा घरी असतानाही ती फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर सतत व्यस्त राहायची. त्यामुळे तिला कुमारने चांगलेच खडसावले आणि तिच्याकडून मोबाईल हिसकावून घेतला. या प्रकारामुळे संतापलेल्या अपर्णाने घराचा दरवाजा बंद करुन पंख्याला गळफास लागून आत्महत्या केली.
दरम्यान, अपर्णाच्या आत्महत्येचे वृत्त समजताच, कुमारनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, नातेवाईकांच्या प्रसंगावधानाने त्याला वाचविण्यात आले.