उद्योग सुरू करण्यासाठी एकच फॉर्म प्रक्रिया अधिक सुलभ
By admin | Published: May 2, 2015 03:29 AM2015-05-02T03:29:26+5:302015-05-02T10:25:25+5:30
नवीन कंपनी सुरू करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने आता एक फॉर्म प्रणाली कार्यान्वित केली असून यामुळे
नवी दिल्ली - नवीन कंपनी सुरू करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने आता एक फॉर्म प्रणाली कार्यान्वित केली असून यामुळे अर्ज केल्यापासून कंपनी स्थापन करण्याच्या प्रक्रियेतील कालावधी लक्षणीयरित्या कमी होणार आहे.
आयएनसी-२९ असे या फॉर्मचे नाव आहे. हा फॉर्म कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आतापर्यंत कंपनीचे नाव, नोंदणी, डायरेक्टर आयडेन्टिफिकेशन नंबर, अशा विविध बाबींच्या पूर्ततेसाठी किमान आठ फॉर्म भरावे लागत होते. या सर्व घटकांतील आवश्यक गोष्टींचा समावेश एकाच फॉर्ममध्ये करून नवा फॉर्म तयार करण्यात आल्याची माहिती कंपनी खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृत्त संस्थेशी बोलताना दिली.
देशातील उद्योग व्यवसाय वाढीस लागवा या दृष्टीने मोदी सरकारने सुरू केलेल्या मेक इन इंडिया मोहिला पुरक असे पाऊल कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने उचचले आहे. या फॉर्मद्वारे कोणत्याही प्रकारच्या कंपनीची नोंदणी करणे शक्य होणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)