Fact Check : 'मोदी सरकार आधार कार्डवर देतंय 2 टक्के व्याजाने कर्ज'; जाणून घ्या, 'त्या' मेसेजमागचं 'सत्य'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 08:19 AM2021-12-14T08:19:11+5:302021-12-14T08:25:30+5:30
Fact Check : पंतप्रधान योजनेंतर्गत सरकार 2 टक्के व्याजाने लोन देत असल्याचा दावा हा व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये करण्यात आला आहे.
नवी दिल्ली - आधार कार्ड (Aadhaar Card) हे आपल्या सर्वांसाठीच एक अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. प्रत्येक काम करताना मग ते सरकारी असो अथा खासगी आधार कार्ड हे लागतं. याच दरम्यान सोशल मीडियावर असंख्य मेसेज हे सातत्याने व्हायरल होत आहेत. अनेकदा त्यातील सर्वच मेसेज हे खरे असतात असं नाही तर काही मेसेज हे अफवा पसरवणारे, फेक असतात. अशावेळी असे खोटे मेसेज इतरांना पाठवण्याआधी त्याची सत्यता तपासणं हे अत्यंत गरजेचं आहे. असाच एक मेसेज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार आधार कार्डवर लोनची सुविधा देत असल्याचं म्हटलं आहे,
पंतप्रधान योजनेंतर्गत सरकार 2 टक्के व्याजाने लोन देत असल्याचा दावा हा व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. त्याशिवाय यात 50 टक्के डिस्काउंट बाबत देखील सांगण्यात आलं आहे. PIB Fact Check ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करून लोकांना याबाबत सावधानता बाळगण्याचा इशारा दिला आहे. सरकारने अशी योजना आणली नसून अशा प्रकारची चुकीची माहिती देणारा मेसेज पूर्णपणे खोटा आणि बनावट आहे. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या असं आवाहन करण्यात आलं आहे. PIB ने आपल्या फॅक्ट चेकमध्ये पीएम योजनेंतर्गत आधार कार्डवर लोन दिलं जात असल्याचा दावा खोटा असल्याचं सांगितलं आहे. लोकांना सावध देखील केलं आहे.
एक फर्जी मैसेज में पीएम योजना के तहत आधार कार्ड से 2% सालाना ब्याज पर लोन दिए जाना का दावा किया जा रहा है।#PIBFactcheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) December 6, 2021
➡️कृपया ऐसे फर्जी संदेशों को शेयर न करें।
➡️यह आपकी निजी जानकारी चुराने का भी प्रयास हो सकता है। pic.twitter.com/cV6eMoahYH
बनावट मेसेज बनवून लोकांची फसवणूक
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) याबाबत लोकांना अलर्ट केलं आहे. मोदी सरकारच्या नावे अशाप्रकारे बनावट मेसेज बनवून लोकांची फसवणूक केली जात आहे. असा मेसेज आल्यास तुम्ही फसू नका असं म्हटलं आहे. तसेच असा मेसेज कुठेही फॉरवर्ड न करण्याचाही सल्ला दिला आहे. मेसेजच्या जाळ्यात अडकून तुमची खासगी माहिती कोणासोबतही शेअर न करण्याचं आवाहन देखील केलं आहे. कोरोना काळात अनेक फेक मेसेज व्हायरल होत होते. PIB ने या काळात खोट्या बातम्या पसरण्यापासून रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले.
खोट्या बातम्या पसरण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न
PIB Fact Check सरकारच्या पॉलिसी/स्कीम्स/विभाग/मंत्रालयं यासंदर्भातील चुकीच्या सूचनांचा लोकांमध्ये प्रसार होऊ नये याकरता काम करते. सरकारसंबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत घेऊ शकता. कोणतीही व्यक्ती PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा किंवा पोस्टचा स्क्रीनशॉट, ट्वीट, किंवा फेसबुक पोस्ट 918799711259 या WhatsApp क्रमांकावर पाठवू शकता. त्याचप्रमाणे pibfactcheck@gmail.com या मेल आयडीवर मेल करून देखील तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.