Fact Check : कोरोनाचा विस्फोट! देशात 3 मे ते 20 मे पर्यंत संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा?; जाणून घ्या त्यामागचं नेमकं 'सत्य'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 02:43 PM2021-05-01T14:43:07+5:302021-05-01T14:55:11+5:30
Fact Check Complete Lockdown In India From May 3 To May 20 : एक मेसेज सध्या जोरदार व्हायरल होत असून ज्यामध्ये देशात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन घोषित करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.
नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,91,64,969 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,01,993 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3523 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,11,853 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या संकटात सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवणारे मेसेज हे व्हायरल होत आहेत. असाच एक मेसेज सध्या जोरदार व्हायरल होत असून ज्यामध्ये देशात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन घोषित करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. या मेसेजमुळे लोकांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. सातत्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लागून करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवरच सध्या पुन्हा एकदा देशभरात संपूर्ण लॉकडाऊनची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याबाबतचे अनेक मेसेजही व्हायरल होत आहेत. कोरोनामुळे केंद्र सरकारने देशभरात 3 मे ते 20 मेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे असा दावा करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. या पोस्टसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोचाही वापर करण्यात आला आहे. मात्र हा दावा पूर्णतः खोटा असल्याची माहिती आता समोर आली आहे.
सोशल मीडिया पर वायरल हो रहे एक पोस्ट में दावा किया जा रहा है कि केंद्र सरकार ने देश में 3 मई से 20 मई तक सम्पूर्ण लॉकडाउन लगाने की घोषणा की है।#PIBFactCheck: यह दावा #फर्जी है। केंद्र सरकार ने ऐसी कोई घोषणा नहीं की है। pic.twitter.com/Xt93IDnMcc
— PIB Fact Check (@PIBFactCheck) April 30, 2021
प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने (Press Information Bureau) लॉकडाऊनबाबत व्हायरल होणारा हा मेसेज खोटा असल्याचं म्हटलं आहे. तसेच असून केंद्र सरकारने अशाप्रकारची कोणतीही घोषणा केलेली नाही असं स्पष्टीकरण पीआयबीने दिलं आहे. त्यामुळेच 3 मे ते 20 मे दरम्यान देशात संपूर्ण लॉकडाऊन लागू होत असल्याचं वृत्त खोटं असल्याचं आता समोर आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनामुळे काही ठिकाणी भीषण चित्र निर्माण झालं आहे. रुग्णालयात ऑक्सिजन आणि बेडची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. दुसरी लाट अत्यंत भयंकर आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. देशात मे महिन्याच्या मध्यावधीत दररोज 5 हजारांहून अधिक मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
CoronaVirus News : भय इथले संपत नाही! ....नाहीतर वेगाने होणार कोरोनाचे खतरनाक नवे व्हेरियंट; डॉक्टरांनी दिला धोक्याचा इशारा#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/xw7iaxQIDs
— Lokmat (@MiLOKMAT) April 29, 2021
कोरोनाचा भयावह वेग! मे महिन्यात देशात दररोज होऊ शकतात 5000 मृत्यू; रिसर्चमधून तज्ज्ञांचा गंभीर इशारा
गेल्या काही दिवसांपासून दोन हजारांहून अधिक कोरोना मृत्यूची नोंद होत असताना संशोधनातून ही माहिती आता समोर आली आहे. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युशनने (IHME) चिंता वाढवणारा इशारा दिला आहे. कोरोनामुळे भारतातील परिस्थिती पुढील काही आठवड्यात आणखी वाईट होईल असं म्हटलं आहे. तज्ज्ञांनी भारतातील सध्याचा संसर्गाची आणि मृत्यू सरासरी यांचाही अभ्यास केला आहे. रिपोर्टनुसार, भारतात कोरोना मृतांची संख्या शिखरावर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच गंभीर परिस्थितीचा इशारा देण्यात आला आहे. 10 मे रोजी भारतात 5 हजार 600 जणांचा कोरोनामुळे मृत्यूची होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच 12 एप्रिल ते 1 ऑगस्ट या कालावधीत देशात 3 लाख 29 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो असा दावा रिसर्चमधून करण्यात आला आहे.
CoronaVirus News : ना मास्क, ना सोशल डिस्टंसिंग! कोरोनाची भीतीच नाही, सर्व नियम धाब्यावर बसवून भाजपा आमदाराच्या मुलाचा शाही विवाहसोहळा#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#BJP#Marriagehttps://t.co/VuCW7gHtKw
— Lokmat (@MiLOKMAT) April 29, 2021
CoronaVirus News : अरे व्वा! कोरोनाग्रस्तांसाठी फायदेशीर ठरतंय 'ऑक्सिजन पार्लर'; 10 मिनिटांत लेव्हलमध्ये होतेय वाढ#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#Oxygen#OxygenCylinderhttps://t.co/9KY9XaFf8Z
— Lokmat (@MiLOKMAT) April 29, 2021