Fact Check : देशातल्या सर्व मुलींना केंद्र सरकार 'या' योजनेअंतर्गत देतंय तब्बल 1.50 लाख रुपये?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 12:47 PM2022-10-09T12:47:52+5:302022-10-09T13:15:35+5:30

Fact Check : देशातल्या मुलींसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्याअंतर्गत गरीब आणि गरजूंना आर्थिक मदत केली जाते.

Fact Check earning money govt give rs 1 lakh 50 thousand under pm mudra yojana check details | Fact Check : देशातल्या सर्व मुलींना केंद्र सरकार 'या' योजनेअंतर्गत देतंय तब्बल 1.50 लाख रुपये?

Fact Check : देशातल्या सर्व मुलींना केंद्र सरकार 'या' योजनेअंतर्गत देतंय तब्बल 1.50 लाख रुपये?

googlenewsNext

केंद्र सरकार देशातल्या मुलींसाठी अनेक योजना राबवत आहे. त्याअंतर्गत गरीब आणि गरजूंना आर्थिक मदत केली जाते. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये सरकारतर्फे PM कन्या आशीर्वाद योजना राबवली जात असल्याची माहिती देण्यात आली असून, त्याअंतर्गत सर्व मुलींना सरकार 1.50 लाख रुपये देत असल्याचा दावा केला जात आहे; पण सरकारने मात्र आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या व्हायरल व्हिडिओशी संबंधित अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. 

सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं आहे की, केंद्रातल्या मोदी सरकारने प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजना सुरू केली असून सरकार या योजनेंतर्गत प्रत्येक मुलीला 1,50,000 रुपयांची आर्थिक मदत देत आहे. हा व्हिडीओ सरकारी गुरू नावाच्या यू-ट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

'पीआयबी फॅक्ट चेक'ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. या व्हिडिओची सत्यता सांगितली आहे. पीआयबीने ट्विटरमधून स्पष्ट केलं आहे, की सरकार अशी कोणतीही योजना चालवत नाही आणि या व्हिडिओतला मेसेज पूर्णपणे खोटा आहे. सोशल मीडियामध्ये अनेकदा चुकीच्या बातम्या व्हायरल होऊ लागतात. अशा बातम्यांच्या सत्यतेची खात्री आपल्यालाही पटवता येते. 

सोशल मीडिया अकाउंट किंवा Whatsapp वरच्या कोणत्याही बातमीबाबत संशय असल्यास, तुम्ही पीआयबीद्वारे फॅक्ट चेक करून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकला भेट द्यावी लागेल. याशिवाय, तुम्ही 8799711259 हा Whatsapp क्रमांक किंवा pibfactcheck@gmail.com या ई-मेलवरसुद्धा माहिती पाठवू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Fact Check earning money govt give rs 1 lakh 50 thousand under pm mudra yojana check details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा