Fact Check : केंद्र सरकारकडून लोकांना फ्री लॅपटॉप मिळणार?; जाणून घ्या, 'त्या' मेसेजमागचं नेमकं 'सत्य'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 12:31 PM2021-11-13T12:31:35+5:302021-11-13T12:45:30+5:30
Fact Check giving free laptops by government is going viral : 'केंद्र सरकारकडून लोकांना फ्री लॅपटॉप मिळणार' असा मेसेज सध्या व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर असंख्य मेसेज हे सातत्याने व्हायरल होत असतात. अनेकदा त्यातील सर्वच मेसेज हे खरे असतात असं नाही तर काही मेसेज हे अफवा पसरवणारे, फेक असतात. अशावेळी असे खोटे मेसेज इतरांना पाठवण्याआधी त्याची सत्यता तपासणं हे अत्यंत गरजेचं आहे. असाच एक मेसेज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. याच दरम्यान आता 'केंद्र सरकारकडून लोकांना फ्री लॅपटॉप मिळणार' असा मेसेज सध्या व्हायरल होत आहे. अनेकांना ही गोष्ट खरी वाटत आहे.
WhatsApp वर लोकांना पंतप्रधान लॅपटॉप वितरण योजनेअंतर्गत मोफत लॅपटॉप देण्यात येणार असल्याचे मेसेज येत आहेत. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी मेसेजखाली एक फेक लिंकही देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक जण या लिंकवर क्लिक करुन अडचणीत येऊ शकतात. केंद्र सरकारकडून लॅपटॉप फ्री देण्याची अशी कोणतीही योजना सुरू करण्यात आलेली नाही. लोकांचा स्मार्टफोन हॅक करून त्यातील डेटा आणि प्रायव्हेट माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने काही फ्रॉड करणाऱ्यांनी हे फेक मेसेज लोकांना पाठवायला सुरुवात केलेली आहे.
एक फर्जी #WhatsApp मैसेज में दावा किया जा रहा है कि प्रधानमंत्री फ्री लैपटॉप वितरण योजना के तहत सभी को मुफ्त लैपटॉप दिए जा रहे हैं।#PIBFactCheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) November 8, 2021
▪️ ऐसे फर्जी संदेशों से सावधान रहें।
▪️ इन्हें फॉरवर्ड/शेयर न करें।
▪️ ऐसे लिंक व वेबसाइट पर अपनी निजी जानकारी भी साझा न करें। pic.twitter.com/YCytRPmpmg
लोकांना फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा
PIB Fact Check ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करून लोकांना याबाबत सावधानता बाळगण्याचा इशारा दिला आहे. सरकारने अशी योजना आणली नसून अशा प्रकारची चुकीची माहिती देणारा मेसेज पूर्णपणे खोटा आणि बनावट आहे. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या असं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच लोकांना सावध देखील केलं आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) याबाबत लोकांना अलर्ट केलं आहे. मोदी सरकारच्या नावे अशाप्रकारे बनावट मेसेज बनवून लोकांची फसवणूक केली जात आहे. असा मेसेज आल्यास तुम्ही फसू नका असं म्हटलं आहे.
खोट्या बातम्या पसरण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न
कोरोना काळात अनेक फेक मेसेज व्हायरल होत होते. PIB ने या काळात खोट्या बातम्या पसरण्यापासून रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. PIB Fact Check सरकारच्या पॉलिसी/स्कीम्स/विभाग/मंत्रालयं यासंदर्भातील चुकीच्या सूचनांचा लोकांमध्ये प्रसार होऊ नये याकरता काम करते. सरकारसंबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत घेऊ शकता. कोणतीही व्यक्ती PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा किंवा पोस्टचा स्क्रीनशॉट, ट्वीट, किंवा फेसबुक पोस्ट 918799711259 या WhatsApp क्रमांकावर पाठवू शकता. त्याचप्रमाणे pibfactcheck@gmail.com या मेल आयडीवर मेल करून देखील तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.