Fact Check : सुशांत प्रकरणाची चौकशी आता आरोग्यमंत्री हर्षवर्धन करणार? जाणून घ्या, व्हायरल सत्य...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 09:12 AM2020-10-07T09:12:13+5:302020-10-07T09:16:27+5:30
Sushant Singh Rajput death case : सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही मीडियाच्या रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, आता सुशांत प्रकरणाची चौकशी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन करणार आहेत.
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सोशल मीडियावर दररोज काहीतरी व्हायरल होत आहे. बर्याच व्हायरल रिपोर्टमध्ये सुशांतच्या मृत्यूबाबत वेगळीच थेअरी मांडली जात आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही मीडियाच्या रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, आता सुशांत प्रकरणाची चौकशी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन करणार आहेत. दरम्यान, या व्हायरल रिपोर्टमधील दावा सत्य आहे काय ? ते जाणून घ्या...
रिपब्लिक भारत या न्यूज चॅनलच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेल्या बुलेटिनमध्ये हा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओ चॅनेलचा बुलेट 100 असे नाव असलेला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे शीर्षक सुशांत प्रकरणाची चौकशी स्वत: डॉ. हर्षवर्धन करणार आहेत, असे देण्यात आले आहे. मात्र, याबाबत डॉ. हर्षवर्धन यांनी स्वत: खुलासा केला आहे.
डॉ. हर्षवर्धन यांनी स्वत: च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "मी सुशांत प्रकरणाची चौकशी माझ्या स्वत: च्या देखरेखीखाली करत आहे, असा दावा मीडियातील एका भागात केला जात आहे, तो चुकीचा आहे. या संदर्भात मी कोणाशीही बोललो नाही. तसेच, कोणत्याही प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले नाही. कोणत्याही असंवेदनशील विधानावर विश्वास करणे टाळा."
#FakeNews
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) October 6, 2020
An INCORRECT claim is being made in a section of the media that I have offered to take personal cognisance of Sushant death case.
I’ve NOT spoken to anyone nor offered to examine any case. Pls refrain from believing any unverified statements.#SushantSinghRajputCase
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा मेसेज रिपब्लिक भारत वगळता इतर कुठल्याही न्यूज प्लॅटफॉर्मवर नाही.
काय आहे निष्कर्ष ?
डॉ. हर्षवर्धन यांनी सुशांत प्रकरणाची स्वत: चौकशी करण्यासाठी निवेदन दिले नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर शेअर केल्या जाणार्या बातम्या खोट्या आहेत.
सुशांतची हत्या नव्हे आत्महत्या, एम्सचा अहवाल
बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची हत्या झाली नसून त्याने आत्महत्या केली आहे, असा निष्कर्ष एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी काढला आहे. त्यामुळे त्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले का, यादृष्टीने सीबीआय तपास करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सुशांतने आत्महत्याच केली अशा निष्कर्षाप्रत मुंबई पोलीस आले होते. पण मुंबई पोलिसांवर विश्वास नसल्याचे सांगून सुशांतचे कुटुंबीय आणि बिहार पोलिसांनी तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी केली होती. सुशांतसिंह याचा शवचिकित्सा अहवाल व अन्य बाबींची फेरतपासणी डॉ. गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने केली. सुशांतसिंह याच्या व्हिसेराचा २० टक्के नमुना फेरतपासणीसाठी उपलब्ध असल्याने, त्याची तपासणी करून एम्सच्या डॉक्टरांच्या पथकाने हा निष्कर्ष काढला आहे.