सुरी हल्लेखोरास पकडण्यात पोलिसांना अपयश

By admin | Published: January 20, 2016 01:51 AM2016-01-20T01:51:34+5:302016-01-20T01:51:34+5:30

वास्को : सोमवारी रात्री येथील कदंब बस स्थानकाशेजारी झालेल्या सुरीहल्ला प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत.

Failure to catch the Suri attackers | सुरी हल्लेखोरास पकडण्यात पोलिसांना अपयश

सुरी हल्लेखोरास पकडण्यात पोलिसांना अपयश

Next
स्को : सोमवारी रात्री येथील कदंब बस स्थानकाशेजारी झालेल्या सुरीहल्ला प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत.
सोमवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक सागर एकोस्कर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दोघांमध्ये झालेल्या शाब्दिक बाचाबाचीवरून हा प्रकार घडला. सॅम या आरोपीने आपला जुना सहकारी मायाराम गौर (24, मूळ उत्तर प्रदेश, सध्या रा. खारवीवाडा) याच्यावर रागाच्या भरात फास्ट फूड गाड्यावरील सुरीने हल्ला करून पसार झाला. त्याबाबत कदंब बसस्थानकाजवळील फास्टफूड व्यावसायिक राजकुमार शर्मा यांनी वास्को पोलीस स्थानकात नोंदविलेल्या तक्रारीनुसार आरोपी सॅम (34) हा संध्याकाळी त्याच्या गाड्यावर येऊन बसला होता. त्यावेळी मायाराम गौर हा आपल्या सेंट अँन्र्डयूज चर्चजवळ असलेल्या हॉटेलसाठी ब्रेड नेण्यासाठी आला. सॅम आणि मायाराम गौर हे एकमेकांना ओळखत असून त्यांच्यात पूर्वीपासून वैर होते. यावेळी दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली आणि त्याचे पर्यवसान हल्ल्यात झाले. बाचाबाचीत राग अनावर न झाल्याने सॅम याने त्या टपरीवरील सुरा घेऊन मायारामच्या पोटावर वार केला आणि मोटारसायकलवरून पसार झाला. जखमी झालेल्या मायारामला प्रथम चिखली सरकारी कुटिर रुग्णालयात नेण्यात आले. पण नंतर त्याला गोमेकॉत हलविण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वास्को पोलिसांनी आरोपी सॅमविरुद्ध भादंसंच्या 336 कलमाखाली गुन्हा नोंदविला आहे. आरोपी कालपासून फरारी असून वास्को पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 24 तास उलटले तरी पोलिसांना तो अजूनही सापडू शकलेले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Failure to catch the Suri attackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.