गंडा घातलेल्या पैशात केली मौजमस्ती फसवणूक प्रकरण : दोघांकडून ४० नियुक्तीपत्रे जप्त

By admin | Published: October 22, 2016 07:19 PM2016-10-22T19:19:58+5:302016-10-22T19:19:58+5:30

जळगाव: रेमंड कंपनीत लिपिक म्हणून नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून दहा तरुणांना सहा लाखात गंडा घातल्यानंतर त्या पैशात गणेश गोटू विसपुते (रा.नेरी दिगर ता.जामनेर) व भूषण अशोक परदेशी (रायपुर ता.जळगाव) या दोघांनी मनसोक्तपणे मौजमस्ती केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, दोघांकडून तरुणांना देण्यात येणारे रेमंड कंपनीच्या लेटरहेडवरील ४० नियुक्तीपत्रे पोलिसांनी हस्तगत केली आहेत.

Failure to cheat 40 fictitious accounts of money laundered | गंडा घातलेल्या पैशात केली मौजमस्ती फसवणूक प्रकरण : दोघांकडून ४० नियुक्तीपत्रे जप्त

गंडा घातलेल्या पैशात केली मौजमस्ती फसवणूक प्रकरण : दोघांकडून ४० नियुक्तीपत्रे जप्त

Next
गाव: रेमंड कंपनीत लिपिक म्हणून नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून दहा तरुणांना सहा लाखात गंडा घातल्यानंतर त्या पैशात गणेश गोटू विसपुते (रा.नेरी दिगर ता.जामनेर) व भूषण अशोक परदेशी (रायपुर ता.जळगाव) या दोघांनी मनसोक्तपणे मौजमस्ती केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, दोघांकडून तरुणांना देण्यात येणारे रेमंड कंपनीच्या लेटरहेडवरील ४० नियुक्तीपत्रे पोलिसांनी हस्तगत केली आहेत.
गणेश व भूषण या दोघांना प्रत्येकी ६० हजार या प्रमाणे दहा तरुणांना सहा लाखात गंडा घातल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला होता.एमआयडीसी पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच गणेश याला ताब्यात घेण्यात आले आहे, त्यानंतर त्याच रात्री भूषणच्याही मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. सध्या दोन्हीही पोलीस कोठडीत आहेत.
चार प्रकारचे पत्र जप्त
गणेश व भूषणकडून रेमंड कंपनीच्या लेटरपॅडवर इंग्रजीत मजकूर असलेले नियुक्ती पत्र, प्रशिक्षण पूर्ण केल्याचे पत्र, कायम करण्यात येत असल्याचे पत्र तसेच नियुक्तीला उशीर होत असल्याने वेतनाच्या ५ टक्के भरपाई देण्याचे पत्र दिले होते. या चार प्रकारचे पत्र हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच दोघांच्या घराची तसेच घटनास्थळाची तपासणी करण्यात आली.

Web Title: Failure to cheat 40 fictitious accounts of money laundered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.