बिघाड गोंदियात, फटका जळगावात

By admin | Published: May 16, 2016 12:44 AM2016-05-16T00:44:50+5:302016-05-16T00:44:50+5:30

जळगाव : गोंदिया जिल्‘ातील तिरोडा येथील अदाणी पॉवरस्टेशनवर आलेल्या जनरेशनच्या समस्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात १५ रोजी पहाटे १ वाजेपासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे १६ तास आपत्कालीन लोडशेडींग करावे लागले. लोडशेडींगचा फटका जळगाव जिल्‘ालाही बसला असून जनजीवन विस्कळीत झाले.

Failure in Gondiya, Shasta Jalgaon | बिघाड गोंदियात, फटका जळगावात

बिघाड गोंदियात, फटका जळगावात

Next
गाव : गोंदिया जिल्‘ातील तिरोडा येथील अदाणी पॉवरस्टेशनवर आलेल्या जनरेशनच्या समस्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात १५ रोजी पहाटे १ वाजेपासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे १६ तास आपत्कालीन लोडशेडींग करावे लागले. लोडशेडींगचा फटका जळगाव जिल्‘ालाही बसला असून जनजीवन विस्कळीत झाले.
अदाणी पॉवरस्टेशनवर जनरेशनच्या बिघाडामुळे तेथील वीज निर्मितीचे काही संच बंद पडल्याने संपूर्ण महाराष्ट्राला आवश्यक वीजेची निर्मिती होण्यास अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे आपत्कालीन लोडशेडींग करण्यात आल्याचे जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता जे.एम.पारधी यांनी सांगितले.
जिल्‘ात १६४ फिडरवर लोडशेडींग
जिल्‘ातील २०७ पैकी १६४ फिडरवर पहाटे १ वाजेपासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत टप्प्या टप्प्याने तब्बल १६ तासाचे लोडशेडींग करण्यात आले. त्यात शहरी भागात २० ते २५ मेगाव्हॅट तीन तासाचे व ग्रामीण भागात १५ ते २० मेगाव्हॅट ४.३० तासाचे लोडशेडींग करण्यात आले.
आधीच उच्चांक तापमानाने जळगावकर हैराण
जळगावात तापमानाने सवार्ेच्चांक गाठला असून उकाड्यामुळे जनजीवन आधीच हैराण झाले आहे, त्यातच झालेल्या आपत्कालीन लोडशेडींगमुळे उकाड्यात अधीक भर पडली. त्यामुळे लहान बालक, अबालवृद्ध, महिलावर्गांना गरमीचा सामना करावा लागला. बर्‍याच भागात पहाटे १ वाजेपासून वीज गुल झाल्याने पंखा, कुलर बंद झाले व उकाड्यामुळे हैराण व्हावे लागले. तसेच भरदुपारीही वीज नसल्याने नागरिकांना त्रस्त व्हावे लागले.

कोट-
संध्याकाळी पाच वाजेपासून लोडशेडींग स्थगीत झाले असून जर समस्या पुन्हा उद्भवली तर लोडशेडींग पुुर्वरत करण्यात येईल.
-जे.एम.पारधी, मुख्य अभियंता, महावितरण

Web Title: Failure in Gondiya, Shasta Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.