दूषित पाण्याचा शोध घेण्यात अपयश बळीरामपेठ : आजही राबविणार शोधमोहीम

By admin | Published: February 19, 2016 10:26 PM2016-02-19T22:26:16+5:302016-02-19T22:26:16+5:30

जळगाव : बळीरामपेठ भागात गेल्या दहा दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा कशामुळे होत आहे? याचा शोध घेण्यास शुक्रवारीही मनपा पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांना अपयश आले. त्यामुळे आता शनिवारी बॉम्बे लॉज परिसरात समस्येचा शोध घेतला जाणार आहे.

Failure to search for contaminated water. Bilirpeth: Even today the search engine will run | दूषित पाण्याचा शोध घेण्यात अपयश बळीरामपेठ : आजही राबविणार शोधमोहीम

दूषित पाण्याचा शोध घेण्यात अपयश बळीरामपेठ : आजही राबविणार शोधमोहीम

Next
गाव : बळीरामपेठ भागात गेल्या दहा दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा कशामुळे होत आहे? याचा शोध घेण्यास शुक्रवारीही मनपा पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांना अपयश आले. त्यामुळे आता शनिवारी बॉम्बे लॉज परिसरात समस्येचा शोध घेतला जाणार आहे.
गटारीजवळ एखाद्या जलवाहिनीला गळती लागली असावी, त्यामुळे दूषित पाणीपुरवठा होत असावा, असा अंदाज व्यक्त करीत पाणीपुरवठा विभागातर्फे प्लंबर पाठवून पाइपलाईनची तपासणीही करण्यात आली. मात्र त्यात काहीही आढळून आले नाही. या भागात शुक्रवारी पाणीपुरवठा होणार आहे. तेव्हा जलवाहिनीला कुठे गळती लागली आहे का? याची तपासणी केली जाईल. समस्येवर तातडीने तोडगा काढला जाईल, असे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी.एस.खडके यांनी सांगितले होते. शुक्रवारी या भागात पाणीपुरवठा झाला तेव्हा भाजपा कार्यालय, बळीरामपेठ चौकात गटारीत कुठे पाईपलाईनला गळती आहे का? याचा शोध घेण्यात आला. मात्र मूळ कारण शोधण्यात अपयश आले. त्यामुळे शनिवारी बॉम्बे लॉज परिसरात शोध घेतला जाणार आहे.
----- इन्फो-----
नागरिकांची गैरसोय
दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. लांबून पिण्यासाठी पाणी भरून आणावे लागत आहे.

Web Title: Failure to search for contaminated water. Bilirpeth: Even today the search engine will run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.