मोदी सरकारला तीन लाख कोटी खर्च करण्यात अपयश; काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 04:06 AM2020-01-14T04:06:05+5:302020-01-14T04:06:30+5:30

धक्कादायक आर्थिक अराजकाचे हे उदाहरण, अपयशामागची कारणे काय?

Failure to spend Rs three lakh crore on Modi government; Congress alleges | मोदी सरकारला तीन लाख कोटी खर्च करण्यात अपयश; काँग्रेसचा आरोप

मोदी सरकारला तीन लाख कोटी खर्च करण्यात अपयश; काँग्रेसचा आरोप

Next

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकार २०१५ पासून तीन लाख कोटींपेक्षा जास्त कराची रक्कम वापरण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप काँग्रेसने सोमवारी केला. मोदी सरकारचे हे धक्कादायक, असे आर्थिक अराजक आहे, असे पक्षाचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला टिष्ट्वटरवर म्हणाले. प्रसारमाध्यमात आलेल्या बातमीचा आधार घेऊन सूरजेवाला यांनी दावा केला की, ‘आर्थिक वर्ष २०१५ आणि २०२० दरम्यान उपयोगात न आलेला आणि पडून असलेला एकत्रित निधी (सीएफआय) हा ३.५९ लाख कोटी रुपयांचा आहे.’ ‘हे आर्थिक अराजकाचे धक्कादायक उदाहरण आहे. २०१४-२०१५ ते २०१९-२०२० दरम्यान मोदी सरकारला तब्बल ३,५९,००० कोटी रुपयांच्या कर रकमेचा उपयोग करण्यात अपयश आले आहे. ही केवळ आर्थिक अकार्यक्षमता आहे,’ असे सूरजेवाला म्हणाले. मोदी सरकारने मारहाण केली, लाठीमार केला, परवडणारे शिक्षण द्या असे म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांवर अश्रुधुराचा वापर केला. केंद्रीय विद्यापीठांमध्ये वाढीव परीक्षा शुल्क परत देण्यास मोदी सरकारने नकार दिला व त्याचवेळी सरकार २०१४-२०१५ ते २०१९-२०२० दरम्यान उच्च शिक्षण कर म्हणून गोळा केलेले ४९,१०१ कोटी रुपये खर्च करण्यात अपयशी ठरले आहे, असे ते म्हणाले. या अपयशामागची कारणे काय आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला.

हवेच्या प्रदूषणामुळे भारताचा श्वास गुदमरतो आहे, दिल्ली आणि अनेक शहरे ही गॅस चेंबर्स बनली आहेत आणि २१ व्या शतकात प्रदूषण हे एकमेव सगळ्यात मोठे आव्हान बनले आहे. तरीही मोदी सरकार २०१४-२०१५ आणि २०१९-२०२० दरम्यान स्वच्छ ऊर्जा कर म्हणून गोळा केलेल्या ३८,९४३ कोटी रुपयांचा उपयोग करू शकण्यात अपयशी ठरले आहे, असे सूरजेवाला म्हणाले.

Web Title: Failure to spend Rs three lakh crore on Modi government; Congress alleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.