नकली नोटा तस्करी प्रकरण

By admin | Published: January 30, 2015 09:11 PM2015-01-30T21:11:47+5:302015-01-30T21:11:47+5:30

नकली नोटांच्या तस्करास

Fake currency smuggling case | नकली नोटा तस्करी प्रकरण

नकली नोटा तस्करी प्रकरण

Next
ली नोटांच्या तस्करास
चार वर्षे कारावास

आढळल्या होत्या १.४७ लाखांच्या नोटा

एटीएसने केली होती कारवाई

नागपूर : भारतीय चलनाच्या नकली नोटांची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने चार वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.
नसीम शेख बिहारी शेख (२६), असे आरोपीचे नाव असून तो पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील पुर्ला डांगा येथील रहिवासी आहे.

अशी झाली होती कारवाई

दहशतवादविरोधी पथकाने पोलीस निरीक्षक मिलिंद तोतरे आणि त्यांच्या पथकाला ३ मार्च २०१४ रोजी गोपनीय सूत्रांकडून एक इसम नरखेड येथे मोठ्या प्रमाणावर नकली नोटा घेऊन येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या पथकाने सावरगाव नरखेड बसस्थानक भागात आपले जाळे पसरले होते. त्यांना काळ्या रंगाचा टी शर्ट आणि जिन्स पँट घातलेला एक तरुण बसस्थानकाकडून सावरगाव मार्गाने जाताना दिसला होता. लागलीच या पथकाने त्याच्यावर झडप घातली होती. त्याच्याजवळील काळ्या रंगाच्या पॉलिथीन पिशवीत नोटांचे दोन बंडल्स आढळले होते. एका बंडलमध्ये १००० रुपये दराच्या १०० आणि दुसऱ्या बंडलमध्ये ५०० रुपये दराच्या ९४ नोटा होत्या. एकूण १ लाख ४७ हजार रुपयांच्या नकली नोटा या पथकाने पंचांच्या समक्ष जप्त केल्या होत्या.
या नोटांची प्राथमिक तपासणी भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक वाय. एन. उमरेडकर यांनी केली होती. त्यांनी प्रथम दर्शनीच या नोटा बनावटी असल्याचा अभिप्राय दिला होता. कारण या नोटांवर रिझर्व्ह बँकेचा चमकणारा सेक्युरिटी थ्रेड नव्हता. या नोटा तज्ज्ञ अभिप्रायासाठी नाशिकच्या करंसी नोट प्रेसकडे पाठविण्यात आल्या होत्या.
नरखेड पोलिसांनी भादंविच्या ४८९ क कलमान्वये गुन्हा दाखल करून या तस्करास आपल्या ताब्यात घेतले होते. त्याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयात पाच साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला ही शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील दीपक कोल्हे, प्रशांत भांडेकर आणि अजय माहुरकर यांनी काम पाहिले.

Web Title: Fake currency smuggling case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.