धुळ्याच्या पथकाकडून बनावट औषधी जप्त फसवणूक : ढाकेवाडीत कारवाई; एकास अटक
By admin | Published: June 20, 2016 12:22 AM2016-06-20T00:22:14+5:302016-06-20T00:22:14+5:30
जळगाव: प्रिया फार्मासिटीकल्स या नावाने बनावट आयुर्वेदीक औषध तयार करुन त्याची विक्री करुन फसवणूक करणार्या जयंत अनंत शिंदे (वय ५२ रा.ढाकेवाडी) याला औद्योगिक वसाहत पोलिसांनी अटक केली आहे. धुळे येथील अन्न व औषध प्रशासनाने त्याच्या ढाकेवाडीतील घरी धाड टाकून चार हजार ३५० रुपयांचे बनावट औषध जप्त केले आहे. त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Next
ज गाव: प्रिया फार्मासिटीकल्स या नावाने बनावट आयुर्वेदीक औषध तयार करुन त्याची विक्री करुन फसवणूक करणार्या जयंत अनंत शिंदे (वय ५२ रा.ढाकेवाडी) याला औद्योगिक वसाहत पोलिसांनी अटक केली आहे. धुळे येथील अन्न व औषध प्रशासनाने त्याच्या ढाकेवाडीतील घरी धाड टाकून चार हजार ३५० रुपयांचे बनावट औषध जप्त केले आहे. त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ढाकेवाडीतील जयंत शिंदे हे मेसर्स मंदार आयुर्वेदीक प्रॉडक्ट नावाचे बनावट औषध गुजरातमधील कबीलपूर (जि.नवसारी) यांच्या प्रिया फार्मासिटीकल्स या नावाने विक्री करीत असल्याची तक्रार कंपनीने धुळे येथील अन्न व औषध प्रशासनाकडे केली होती. औषध निरीक्षक श्याम साळे यांनी औद्योगिक वसाहत पोलिसांची मदत घेवून शनिवारी रात्री ढाकेवाडीत शिंदे याच्या घरावर धाड टाकली. यावेळी प्लास्टीकच्या पांढर्या रंगाच्या डबीत चार हजार ३५० रुपये किमतीची बनावट आयुर्वेदीक औषध मिळून आली. त्याच्या घरातून ती जप्त करण्यात आली. घटनास्थळाचा पंचनामा करुन शिंदे यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. औषध निरीक्षक श्याम साळे यांनी फिर्याद दिली आहे.