भाजपाकडून फेक मतदानासाठी बनावट बोटांची आयडिया ? जाणून घ्या 'सत्य'कथा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 12:27 PM2019-04-16T12:27:27+5:302019-04-16T12:29:00+5:30

सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे फोटो 2017 च्या विधानसभा निवडणुकांवेळीही सर्वप्रथम इंटरनेटवर दिसून आले होते

Fake fingers to vote for BJP? Learn the 'Truth' story. prosthetic-fingers-from-japan-viral- | भाजपाकडून फेक मतदानासाठी बनावट बोटांची आयडिया ? जाणून घ्या 'सत्य'कथा 

भाजपाकडून फेक मतदानासाठी बनावट बोटांची आयडिया ? जाणून घ्या 'सत्य'कथा 

Next

मुंबई - लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचाराने जोर धरला असून बड्या नेत्यांच्या सभा चांगल्याच गाजत आहेत. तर, पहिल्या टप्प्यातील मतदानादिवशी अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड असल्याचे समोर आले होते. तर, आता सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत. त्यामध्ये हाताची बोटे दिसत असून निवडणुकांमध्ये फेक मतदान करण्यासाठी या बोटांचा वापर करण्यात येत असल्याचा संदेश या फोटोसह फिरत आहे. मात्र, याबाबतची सत्यता वेगळीच आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे फोटो 2017 च्या विधानसभा निवडणुकांवेळीही सर्वप्रथम इंटरनेटवर दिसून आले होते. त्यावेळीही, हे फोटो फेक मतदानासाठी वापरण्यात आलेल्या बोटांचा संदर्भ देत शेअर केले जात होते. तर, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनीही व्हॉट्सअॅपवर शेअर झालेला एक फोटो ट्विटरवर अपलोड करुन कुणी तरी हे पाठवलंय असे कॅप्शन लिहिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे फोटो चर्चेत आले असून याच नेमकं गौडबंगाल काय ? असा प्रश्न नेटीझन्स आणि नागरिकांना पडला आहे. 


कुरेशी यांच्या ट्विटला अनेकांनी उत्तर देताना, हे फोटो युकजा सदस्यांसाठी कुत्रिम बोटांचे प्रतिनिधित्व करत असल्याचं म्हटलं आहे. एबीसी न्यूजने 2013 साली एक शोध पत्रकारितेचा अहवाल दिला होता. त्यानुसार, जपानमधील यकुजा या माफिया संघटनाचे प्रतिक म्हणून ही कापण्यात आलेली बोटे वापरली जातात. 'यूबीत्सुम'च्या नावे प्रसिद्ध असलेल्या एका प्रसंगात, यकुजा सदस्यांना गंभीर गुन्ह्याचे प्रायश्चित करण्यासाठी स्वत:च्या शरीरावरील अंगाचा भाग कापला जातो. विशेष करुन डाव्या हाताच्या करंगळीपासून या प्रायश्चित भोगण्याला सुरुवात केली जाते. तर, पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा केल्यास, दुसऱ्या हाताची बोटे कापली जातात. विशेष म्हणजे हाताची ही तुटलेली बोटे पाहिल्यानंतर या लोकांना येथे कामही दिले जात नाही. 

दरम्यान, जपानद्वारे बनविण्यात आलेल्या खोट्या बोटांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. निवडणुकांवेळी फेक मतदान करण्यासाठी ही बोटे वापरण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यात कुठलेही तथ्य नाही. 
 

Web Title: Fake fingers to vote for BJP? Learn the 'Truth' story. prosthetic-fingers-from-japan-viral-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.