बनावट IAS बनला, मुख्यमंत्र्यांसोबत केलं जेवण, फोटोही काढला; पण सत्य समोर आलं तेव्हा…

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 07:51 AM2022-07-30T07:51:12+5:302022-07-30T07:52:33+5:30

तरूणानं आपल्याला युपीएससी परीक्षेत ३५७ वा रँक मिळाल्याचा दावा केला होता. त्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांनी त्याला सन्मानितही केलं होतं.

fake ias up kumar saurabh honored jharkhand cm soren own ranking fir registered lcl | बनावट IAS बनला, मुख्यमंत्र्यांसोबत केलं जेवण, फोटोही काढला; पण सत्य समोर आलं तेव्हा…

बनावट IAS बनला, मुख्यमंत्र्यांसोबत केलं जेवण, फोटोही काढला; पण सत्य समोर आलं तेव्हा…

googlenewsNext

झारखंडमधील मुख्यमंत्री सचिवालयाच्या डोळ्यात धूळ फेकत, पलामूच्या एका बनावट आयएएसने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासोबत फोटो काढला आणि अभिनंदन समारंभाला हजेरी लावली. स्वत:ला एक यशस्वी यूपीएससी आणि ३५७ रँकधारक म्हणून सांगणाऱ्या कुमार सौरभने मुख्यमंत्री सचिवालयालाही फसवल्याचा प्रकार घडला.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या समवेत आयोजित केलेल्या खानपानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून सत्कार करण्यासाठी पडताळणी न करताच अशा प्रकारे कसे पाठवले गेले, ही सर्वात मोठी चूक सरकारकडून घडली आहे. ही चूक लक्षात आल्याने सरकारच्या वतीने कुमार सौरभवर रांचीच्या धुर्वा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ यानं आपल्याला युपीएससीच्या परीक्षेत ३५७ वा क्रमांक मिळाला असल्याचं स्वत:च सांगितलं होतं. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.


परंतु सत्य समोर आल्यानंतर शुक्रवारी पलामूचे उपायुक्त आंजनेयुल दोड्डे यांच्या सूचनेवरून पांडू बीडीओ राहुल ओराव यांनी पांडू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दुसरीकडे, राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे एमआयएस अधिकारी कुमार चंदन यांनी रांचीच्या धुर्वा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.

समारंभाचं आयोजन
मुख्यमंत्र्यांनी नागरी सेवा परीक्षा २०२१ मध्ये झारखंडच्या यशस्वी उमेदवारांचा सत्कार करण्यासाठी सत्कार समारंभ आयोजित केला होता. यासाठी विभागाच्या वतीने सर्व जिल्ह्यांच्या उपायुक्तांना आपापल्या क्षेत्रातील यशस्वी उमेदवारांची माहिती देण्यास सांगण्यात आले होते. त्यात पलामू येथील यशस्वी व्यक्ती म्हणून कुमार सौरभ, पुत्र दिवंगत डॉ. दिलीप पांडे (रा.पांडू गाव) अशी माहिती देण्यात आली. यानंतर तथाकथित उमेदवाराला बोलावून मुख्यमंत्र्यांच्या सत्कार समारंभाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण पाठवण्यात आले होते अशी माहिती एमआयएस प्राधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

यानंतर २६ जुलै रोजी तो सत्कार समारंभात आपल्या कुटुंबीयांसह सहभागीही झाला होता. तसंच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचा सन्मानही करण्यात आला. परंतु सत्य समोर आल्यानंतर त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सौरभनं युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्याचं सांगत आपला ३५७ रँक आल्याचं सांगितलं. तसंच त्यानं आपलं अॅडमिट कार्डही पाठवलं. परंतु त्यात काही तथ्यांशी छेडछाड केल्याचंही समोर आलं.

खऱ्या उमेदवारानं आणलं सत्य समोर
३५७ वा रँक मिळवणाऱ्या यूपीच्या कुमार सौरभला जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा त्याने सौरभ पांडेचा पर्दाफाश केला. दिल्लीत यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून कुमार सौरभची माहिती मिळाली. यामध्ये झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासोबत कोणीतरी आपल्या नावाने फोटो काढल्याचे त्याला समजले. त्यानंतर कुमार सौरभ यानं पलामूच्या सौरभ पांडे याचे सत्य सर्वांसमोर आणले.

Web Title: fake ias up kumar saurabh honored jharkhand cm soren own ranking fir registered lcl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.