Fake Job Racket: परराष्ट्र मंत्रालयाने म्यानमारमध्ये अडकलेल्या ४५ भारतीयांची केली सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 04:56 PM2022-10-05T16:56:02+5:302022-10-05T17:05:09+5:30
म्यानमारमध्ये बनावट नोकरीच्या जाळ्यात अडकलेल्या ४५ भारतीय तरुणांची सुटका केल्याची, माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. म्यानमारमधील बनावट नोकरी रॅकेटमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या प्रकरणाचा सक्रियपणे शोध घेत असल्याचही म्हटले आहे.
नवी दिल्ली:म्यानमारमध्ये बनावट नोकरीच्या जाळ्यात अडकलेल्या ४५ भारतीय तरुणांची सुटका केल्याची, माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. म्यानमारमधील बनावट नोकरी रॅकेटमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या प्रकरणाचा सक्रियपणे शोध घेत आहोत. सुमारे ३२ भारतीयांची आधीच सुटका करण्यात आली आहे. आता आणखी १३ भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे, असंही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
म्यानमारमध्ये बनावट नोकरी रॅकेट चालवणाऱ्या लोकांपासून अनेक भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे, आणि त्या देशात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल ते म्यानमारच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहेत. त्यांना लवकरात लवकर परत आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे,अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.
भाजपाविरोधात चंद्रशेखर राव मैदानात; राष्ट्रीय पक्षाची केली घोषणा, २०२४मध्ये चित्र बदलणार?
काही दिवसापूर्वी भारत सरकारने तरुणांना फॉरेनमध्ये आयटी क्षेत्रातील बनावट नोकऱ्यांबद्दल चेतावणी दिली होती. थायलंडमध्ये नोकरीच्या बहाण्याने म्यानमारमध्ये १०० हून अधिक भारतीयांना फसवणूक करून नेण्यात आल्याच्या प्रकरणानंतर परराष्ट्र मंत्रालयाने लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, भारतातून आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांची फसवणूक करून त्यांना म्यानमारमध्ये पाठवण्यात आले होते. तेथे सायबर फसवणुकीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये काम दिले, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.