हैदराबादेत नकली काझीला अटक, आतापर्यंत लावले २०० निकाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 02:25 AM2017-10-01T02:25:17+5:302017-10-01T02:25:28+5:30
आतापर्यंत २०० निकाह लावणा-या एका नकली काझीला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. अली अब्दुल्ला रफाई असे त्याचे नाव आहे. पोलिसांना असा संशय आहे की, रफाईसोबत मुंबईचे मुख्य काझी फरीद अहमद खान हेही अशाच पद्धतीने निकाह करत होते.
हैदराबाद : आतापर्यंत २०० निकाह लावणा-या एका नकली काझीला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. अली अब्दुल्ला रफाई असे त्याचे नाव आहे. पोलिसांना असा संशय आहे की, रफाईसोबत मुंबईचे मुख्य काझी फरीद अहमद खान हेही अशाच पद्धतीने निकाह करत होते.
हैदराबाद पोलिसांनी एका टोळीचा काही दिवसांपूर्वीच भंडाफोड केला होता. ही टोळी अल्पवयीन मुलींचे अरब देशात विवाह लावून देत होती. पोलिसांनी रफाई आणि फरीद यांच्यासह तीन काझींना अटक केली आहे. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सहायक पोलीस आयुक्त ताजुद्दीन अहमद यांनी सांगितले की, आम्ही जेव्हा वक्फ बोर्डाशी संपर्क केला तेव्हा कळाले की, २०१४ पासून रफाईसाठी एकही फॉर्म जारी करण्यात आला नाही. रफाईची काझी म्हणून
असलेली नियुक्ती काही काळासाठी रोखली होती. त्याला त्याने
उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित
आहे. काझी म्हणून काम करण्यास सद्या त्याला परवानगी नव्हती. त्यामुळेच बोर्डाने त्याला फॉर्म दिला नव्हता.
वडिलांच्या जागी ८0 काझी
रफाईच्या कार्यालयाची झडती घेणे बाकी आहे. कारण, येथील कागदपत्रे अरबी आहेत. त्याची पडताळणी करण्यासाठी हैदराबाद पोलिसांनी वक्फ बोर्डाच्या नसीरुल कजाथ आणि अन्य दोन कर्मचा-यांची मदत घेतली आहे. पोलिसांना असा संशय आहे की, जेव्हा त्याच्या वडिलांचे २०१३ मध्ये निधन झाले त्यानंतर रफाईने वक्फ बोर्डाच्या कर्मचा-यांचा विश्वास मिळवला.
वडिलांच्या मृत्यूनंतर रफाईला काझी म्हणून नियुक्ती मिळाली. पण, तो केवळ एकच दिवस काझी म्हणून राहिला. कारण, दुसºयाच दिवशी त्याची नियुक्ती रद्द करण्यात आली. तेलंगणात असे ८० काझी आहेत ज्यांना वडिलांच्या जागेवर नियुक्ती मिळाली आहे.