पाकिस्तानात सुरु झाली 2 हजार रुपयांच्या बनावट नोटांची छपाई

By admin | Published: February 13, 2017 08:15 AM2017-02-13T08:15:14+5:302017-02-13T08:30:33+5:30

नरेंद्र मोदींनी ज्या विविध कारणांसाठी नोटाबंदीचा इतका मोठा निर्णय घेतला त्यातील एक प्रमुख कारण होते पाकिस्तानात छापल्या जाणा-या बनावट नोटा.

Fake notes of Rs 2 thousand rupees in Pakistan started | पाकिस्तानात सुरु झाली 2 हजार रुपयांच्या बनावट नोटांची छपाई

पाकिस्तानात सुरु झाली 2 हजार रुपयांच्या बनावट नोटांची छपाई

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 13 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या विविध कारणांसाठी नोटाबंदीचा इतका मोठा निर्णय घेतला त्यातील एक प्रमुख कारण होते पाकिस्तानात छापल्या जाणा-या बनावट नोटा. भारतीय चलनातील 500 आणि 1 हजार रुपयांच्या बनावट नोटा मोठया प्रमाणात पाकिस्तानात छापल्या जात होत्या. हे सुद्धा नोटाबंदीच्या निर्णयामागचे एक प्रमुख कारण होते. 
 
पण आता पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतीय चलनातील 2 हजार रुपयांची बनावट नोटा छापण्यास सुरुवात केल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. या नोटा तस्करांमार्फत भारत-बांगलादेश सीमेवरुन भारतात आणल्या जात असल्याची माहिती आहे. एनआयए आणि बीएसएफने मुर्शिदाबाद येथून अटक केलेल्या अझीझूर रहमानच्या (26) चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 
 
तो मूळचा पश्चिम बंगालमधील मालदाचा निवासी आहे. त्याच्याकडे 2 हजार रुपयांच्या 40 बनावट नोटा सापडल्या. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या मदतीने या नोटा पाकिस्तानात छापण्यात आल्याची माहिती त्याने चौकशीत दिली. बांगलादेश सीमेवरुन या नोटांची तस्करी चालते असे त्याने सांगितले.
 
2 हजार रुपयांच्या बनावट नोटा भारतात पोहोचवण्यासाठी तस्करांना प्रत्येक नोटेमागे 400 ते 600 रुपये मोजावे लागतात अशी माहिती सूत्रांनी दिली. जप्त केलेल्या बनावट नोटांचा तपासकर्ते आणि तज्ञांनी अभ्यास केल्यानंतर त्यातील 17 सुरक्षा फिचर्सपैकी 11 फिचर्सची नक्कल झाल्याचे लक्षात आले. 
 
वॉटरमार्क, अशोक स्तंभ, डाव्या बाजूला लिहीलेले 'Rs 2000', देवनागिरीमध्ये लिहीलेला क्रमांक याची हुबेहूब नक्कल झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. ख-या नोटांशी या नोटा मिळत्या-जुळत्या वाटत असल्या तरी, त्यांची छपाई आणि कागदाचा दर्जा सुमार असल्याचे तपासकर्त्यांनी सांगितले. 
 

Web Title: Fake notes of Rs 2 thousand rupees in Pakistan started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.