काय सांगता! संपूर्ण पाेलीस ठाणेच बाेगस, आठ महिन्यांपासून सुरू हाेता कारभार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 01:41 PM2022-08-19T13:41:45+5:302022-08-19T13:43:00+5:30

Fake police station: बांका शहराच्या मध्यवर्ती भागात एका हाॅटेलमध्ये हे बाेगस पाेलीस ठाणे सुरू हाेते. धक्कादायक बाब म्हणजे, बांका पाेलीस ठाणे तेथून केवळ अर्धा किलाेमीटर अंतरावर आहे.

Fake police station: Gang ran fake police station for eight months in Bihar | काय सांगता! संपूर्ण पाेलीस ठाणेच बाेगस, आठ महिन्यांपासून सुरू हाेता कारभार

काय सांगता! संपूर्ण पाेलीस ठाणेच बाेगस, आठ महिन्यांपासून सुरू हाेता कारभार

Next

पाटणा : आतापर्यंत ताेतया पाेलीस किंवा इतर तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांकडून हाेणाऱ्या फसवणुकीच्या बातम्या वाचल्या असतील. मात्र, एक संपूर्ण पाेलीस ठाणेच बाेगस असल्याचे उघडकीस आले आहे. पाेलीस उपअधीक्षकांपासून हवालदारांपर्यंत सर्वजण बाेगस हाेते. बिहारच्या बांका येथे हा प्रकार उघडकीस आला असून, गेल्या आठ महिन्यांपासून हा बाेगस कारभार सुरू हाेता. 

बांका शहराच्या मध्यवर्ती भागात एका हाॅटेलमध्ये हे बाेगस पाेलीस ठाणे सुरू हाेते. धक्कादायक बाब म्हणजे, बांका पाेलीस ठाणे तेथून केवळ अर्धा किलाेमीटर अंतरावर आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी गणवेशात हजर राहायचे. प्रत्येकाला दरराेज ५०० रुपये देण्यात येत हाेते. या एकूण प्रकाराची पाळेमुळे शाेधण्यात येत असल्याचे शंभू यादव यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

असा उघडकीस आला प्रकार
बांका पाेलीस ठाण्याचे ठाणेदार शंभू यादव गस्त घालत हाेते. त्यांना एक गणवेशधारी तरुण दिसला. त्याने पाेलीस उपअधीक्षक पदाचा बॅज लावला हाेता. मात्र, त्याची एकूणच वागणूक त्यांना संशयास्पद वाटली. त्याची चाैकशी केल्यानंतर बाेगस ठाण्याचा प्रकार उघडकीस आला.

चाैकशीच्या नावाखाली खंडणीखाेरी
या प्रकरणात पाचजणांना अटक करण्यात आली आहे. आकाशकुमार हा पाेलीस उपअधीक्षक बनला हाेता. अनिता देवी नावाच्या एका तरुणीलादेखील अधिकारी बनवून तैनात केले हाेते. सर्व्हिस रिव्हाॅल्व्हरच्या नावाखाली तिला देशी कट्टा दिला हाेता. सरकारी याेजनांच्या चाैकशीच्या नावाखाली हे लाेक खंडणीखाेरी करत हाेते. 

Web Title: Fake police station: Gang ran fake police station for eight months in Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.