बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 14:34 IST2025-04-21T14:33:39+5:302025-04-21T14:34:08+5:30

Fake Rs 500 Notes : चलनात येणाऱ्या बनावट नोटा हे आपल्या व्यवस्थेसमोरील मोठं आव्हान आहे. दरम्यान, आता बाजारामध्ये खऱ्या नोटांप्रमाणे हुबेहूब दिसणाऱ्या बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने चिंता व्यक्त करत हाय अलर्ट दिला आहे.

Fake Rs 500 notes are rife in the market, a slight oversight can lead to high prices, government warns | बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 

बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 

चलनात येणाऱ्या बनावट नोटा हे आपल्या व्यवस्थेसमोरील मोठं आव्हान आहे. दरम्यान, आता बाजारामध्ये खऱ्या नोटांप्रमाणे हुबेहूब दिसणाऱ्या बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने चिंता व्यक्त करत हाय अलर्ट दिला आहे. ५०० रुपयांच्या या नोटा अगदी खऱ्या नोटांप्रमाणे दिसतात. खऱ्या नोटा आणि खोट्या नोटा यामधील फरक ओळखणं कठीण आहे. मात्र काही गोष्टी बारकाईने पाहिल्यावर, परखल्यावर हा फरक ओळखणे शक्य होईल, असं सरकारनं म्हटलं आहे.  

५०० रुपयांच्या बनावट नोटांबाबत बजावलेल्या अलर्टबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितले की, बनावट नोटा ह्या गुणवत्ता आणि छपाईच्याबाबतीत खऱ्या नोटांशी मिळत्याजुळत्या आहेत. त्यामुळे त्यांना ओळखणं  कठीण आहे. यांचा रंग आणि रूप हुबेहूब खऱ्या नोटांप्रमाणेच आहे. गृहमंत्रालयाने सांगितले की, .या नोटा ५०० रुपयांच्या खऱ्या नोटांप्रमाणे दिसत असल्या तरी त्यांच्या स्पेलिंगमध्ये एक चूक झालेली आहे. त्यामुळे त्या सहजपणे ओळखता येतात. ५०० रुपयांच्या बनावट नोटेवर RESERVE BANK OF INDIA या ओळीमध्ये ही चूक झालेली आहे. त्यात RESERVE या शब्दामध्ये एकेठिकाणी E च्या ऐवजी A चा वापर करण्यात आला आहे. 

ही छोटीशी चूक सहजपणे नजरेत येत नाही. त्यामुळे या नोटा सहजपणे चलनात पसरू शकतात, अशी भीती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. दरम्यान, या नोटा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर पसरवण्यात आल्या असल्याचा इशारा तपास यंत्रणांनी दिला आहे. तसेच बँका आणि नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन केले आहे.   

Web Title: Fake Rs 500 notes are rife in the market, a slight oversight can lead to high prices, government warns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.