दरवर्षी कापसाच्या भावात घसरण
By admin | Published: January 27, 2015 11:38 PM2015-01-27T23:38:27+5:302015-01-27T23:38:27+5:30
बाजारात कोणत्याही वस्तूचे असो वाढलेले दर कमी झाले असे क्वचितच होते. बहुदा असलेले दर वाढल्याचेच उदाहरण आहे. हा नियम मात्र कापसासंदर्भात खोटा ठरत आहे. दर वर्षाला कापसाचे दर कमी झाल्याचेच
हेमंत चंदनखेडे - हिंगणघाट
बाजारात कोणत्याही वस्तूचे असो वाढलेले दर कमी झाले असे क्वचितच होते. बहुदा असलेले दर वाढल्याचेच उदाहरण आहे. हा नियम मात्र कापसासंदर्भात खोटा ठरत आहे. दर वर्षाला कापसाचे दर कमी झाल्याचेच दिसून आले आहे.
कापूस सोडून सर्वच शेतमालाच्या हमीभावात वाढ झाली असताना कापससाचे दर खाली गेले आहेत. वर्ष २०१३-१४ मध्ये कापसाच्या वेगवेगळ्या वाणाचा एकंदरीतरित्या सरासरी दर ४ हजार ५०० पसून ४ हजार ६०० रुपयांवर स्थिरावला होता. यंदा हा दर ४ हजार रुपयांच्या असापास असला तरी शेतकऱ्यांच्या हाती त्याहूनही कमीच रक्कम येत आहे. २०१२-१३ मध्ये तर याच कापसाचा प्रति क्विंटल दर ५ हजार रुपयांच्यावर होता. अन्य शेतमालाचे दर वाढत असताना त्याला कापूस हा अपवाद ठरत आहे. पडणारे भाव न उलगडणार कोडेच ठरत आहे. याउलट ऊस उत्पादकांचे आहे.
ऊस उत्पादक शेतकरी मात्र दरवेळेस ऊसाचा दर वाढवून आणण्यात यशस्वी होतात. कृषी मुल्य आयोगाने आगामी हंगामासाठी ऊसाला टनामागे २ हजार २०० रुपये दर मान्य केल्याने ऊसाला १२५ रुपये वाढीव दर मिळणार आहे. गत वर्षीच्या तुलनेत ही वाढ सरासरी ५ टक्के आहे. विशेष म्हणजे गत वर्षीच्या तुलनेत बाजारात साखरेचे दर घसरत होते. यात साखर कारखान्यांना एक आर.पी. देणे शक्य होत नसूनही ते दर वाढतात, हे विशेष. विदर्भात हिंगणघाट कापसाचा भाग म्हणून ओळखल्या जात आहे. पांढऱ्या सोन्याची खरेदी विक्रीचे हे क्षेत्र बनले आहे. जिल्ह्यातील एकूण कापूस खरेदीच्या सुमारे ६० टक्क्यावर खरेदी हिंगणघाट परिसरात झाल्याची माहिती आहे.