बॅँकेतून बोलत असल्याचे सांगून ४५ हजारात गंडवले फसवणूक : रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By admin | Published: August 24, 2016 11:17 PM2016-08-24T23:17:03+5:302016-08-24T23:17:03+5:30
जळगाव : बॅँकेतून व्यवस्थापक बोलत असल्याचे सांगून बॅँक ग्राहकाचा आधार क्रमांक व खाते क्रमांक घेऊन एकाची ४५ हजार रुपयांत फसवणूक केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Next
ज गाव : बॅँकेतून व्यवस्थापक बोलत असल्याचे सांगून बॅँक ग्राहकाचा आधार क्रमांक व खाते क्रमांक घेऊन एकाची ४५ हजार रुपयांत फसवणूक केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आत्माराम तुळशीराम शेळके (वय ५७, रा.शिंदेनगर, पिंप्राळा, जळगाव) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा प्रकार १६ ऑगस्ट रोजी घडला आहे. यासंदर्भात आत्माराम शेळके यांनी २४ रोजी फिर्याद दाखल केली. १६ ऑगस्ट रोजी शेळके यांच्या मोबाइलवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. पलीकडून बोलणार्या व्यक्तीने आपण बॅँकेचा व्यवस्थापक बोलत असल्याचे सांगून त्यांचा आधार व बॅँक खाते क्रमांक मागितला. त्यावर विश्वास ठेऊन शेळके यांनी लागलीच माहिती देऊन टाकली. त्यानंतर त्यांच्या खात्यातून क्रमाक्रमाने ४४ हजार ९४९ रुपये काढण्यात आले. यातील काही व्यवहार हे ऑनलाइन शॉपिंगचे आहेत. शेळके यांचे नवीन बसस्टॅँड जवळील सारस्वत बॅँकेत खाते आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेळके यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक आर.पी. घोळवे करत आहेत.