निजामाचा खजिना परत करण्याची कुटुंबियांनी केली मागणी

By admin | Published: April 10, 2017 09:21 AM2017-04-10T09:21:37+5:302017-04-10T09:41:08+5:30

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे असलेला निजामाचा खजिना राज्यसरकारच्या ताब्यात सोपवावा अशी मागणी निजामाच्या कुटुंबियांनी केली आहे.

The families have asked to return the Nizam's treasure | निजामाचा खजिना परत करण्याची कुटुंबियांनी केली मागणी

निजामाचा खजिना परत करण्याची कुटुंबियांनी केली मागणी

Next

 ऑनलाइन लोकमत 

हैदराबाद, दि. 10 - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे असलेला निजामाचा खजिना राज्यसरकारच्या ताब्यात सोपवावा अशी मागणी निजामाच्या कुटुंबियांनी केली आहे. निजामाचे किंमती, मौल्यवान दागिने, अलंकार सर्वसामान्यांना पाहता आले पाहिजेत अशी निजाम कुटुंबाची भूमिका आहे. त्यासाठी त्यांनी निजामाचे दागदागिने राज्य सरकारकडे सोपवण्याची मागणी केली आहे. 
 
यापूर्वी फक्त दोन वेळा 2001 आणि 2006 मध्ये सालार जंग म्युझियममध्ये भरलेल्या प्रदर्शनात सर्वसामान्यांना निजामाचे दागिने पाहता आले होते. लाखो लोकांनी त्यावेळी हे दागिने पाहण्यासाठी गर्दी केली होती. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दागिने परत मिळवण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. निजामाच्या किंमती अलंकारांसाठी हैदराबादचे स्वत:चे म्युझियम असले पाहिजे असे हिमायत अली मिर्झा म्हणाले. ते शेवटच्या निजामाचे पणतू आहेत. 
 
निजामाचे दागिने परत मिळवण्यासाठी राजघराण्याताली सदस्य सर्वोच्च न्यायालयातही दाद मागू शकतात. निजाम कुटुंबियांप्रमाणेच अनेक इतिहासकारांनीही हे दागिने हैदराबादमध्ये ठेवण्याची मागणी केली आहे. या दागिन्यांवर सरकारची मालकी असली पाहिजे पण हे दागिने ज्या शहराचे आहेत त्या हैदराबादमध्ये लोकांना पाहायला मिळाले पाहिजेत अशी इतिहासकारांची भूमिका आहे. कायमस्वरुपी हे दागिने लोकांना पाहता आले तर, भारतातूनच नव्हे परदेशातूनही मोठया संख्येने लोक येतील. त्याचा पर्यटनाला फायदा होईल. 
 
ही राष्ट्रीय संपत्ती असून ती बँकेच्या तिजोरीत बंद राहू नये असे मत काही इतिहासतज्ञांनी व्यक्त केले. तेलंगणमध्ये टीआरएस सरकार आल्यानंतर दागिने परत मिळवण्यासाठी हालचाली होतील अशी अपेक्षा होती. पण तीनवर्षात या सरकारने एकही पाऊल उचलेले नाही. राजस्थानपेक्षा हैदाबाद जास्त आकर्षक शहर आहे पण निजमाची सत्ता संपल्यानंतर 50 वर्षात इतिहास नष्ट झाल्याने इथे कमी पर्यटक येतात असे इतिहास तज्ञांचे मत आहे. 1995 साली हे दागिने आरबीआयच्या तिजोरीत बंद झाले. त्यावर्षी भारत सरकारने निजाम ट्रस्टकडून हे दागिने 218 कोटींना विकत घेतले. या दागिन्यांचे सध्याचे मुल्य 50 हजार कोटी आहे.  
 

Web Title: The families have asked to return the Nizam's treasure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.