या कुटुंबात ५४ जण गुण्यागोविंदाने नांदतात

By admin | Published: March 25, 2017 12:21 AM2017-03-25T00:21:32+5:302017-03-25T00:21:32+5:30

फ्लॅट संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामुळे चौकोनी कुटुंबांची संख्या वाढत गेली. घरात एखादा पाहुणाही नको वाटू लागला. परिणामी

In this family, 54 people take pride in livelihood | या कुटुंबात ५४ जण गुण्यागोविंदाने नांदतात

या कुटुंबात ५४ जण गुण्यागोविंदाने नांदतात

Next

रायपूर : फ्लॅट संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामुळे चौकोनी कुटुंबांची संख्या वाढत गेली. घरात एखादा पाहुणाही नको वाटू लागला. परिणामी, एकत्र कुटुंब पद्धतीही आता कमी-कमी होत आहे, पण एखाद्या कुटुंबात ५४ जण एकत्र गुण्यागोविंदाने नांदतात, असे सांगितले, तर तुमचा विश्वास बसणार नाही, पण अशाही काळात छत्तीसगढच्या बलौदा बाजार जिल्ह्यात दशरमा गावात हे कुटुंब आहे. या घरात १५ सुना आहेत. तरीही त्यांच्यात मतभेद होत नाहीत. कुटुंबात २५ लहान मोठे मुले आहेत. ते शिक्षण घेतात. दोन्ही वेळचा स्वयंपाक महिला एकत्र येऊन बनवितात.
रात्रीच्या वेळी सर्व जण घरी आल्यावर कुटुंबातील सदस्यांची मोजणी केली जाते. मागील सहा पिढ्या एकत्र नांदत आलेल्या आहेत. आज एकीकडे नात्यांमध्ये कटुता वाढत असताना हे कुटुंब एक आदर्श बनले आहे.

Web Title: In this family, 54 people take pride in livelihood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.