कुटुंबावर कर्ज, वडिलांसोबत मजुरी करून शिक्षण केलं पूर्ण; आता झाला सब इन्स्पेक्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 03:34 PM2023-09-23T15:34:47+5:302023-09-23T15:46:28+5:30

घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने कुटुंबावर कायमच कर्ज असायचे. 

family drowned in debt worked laborer with father young man left jobs became sub inspector | कुटुंबावर कर्ज, वडिलांसोबत मजुरी करून शिक्षण केलं पूर्ण; आता झाला सब इन्स्पेक्टर

कुटुंबावर कर्ज, वडिलांसोबत मजुरी करून शिक्षण केलं पूर्ण; आता झाला सब इन्स्पेक्टर

googlenewsNext

राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यातील सरमथुरा उपविभागातील धनेरा या छोट्याशा गावात राहणाऱ्या व्यक्तीने घवघवीत यश संपादन केले आहे. सरमथुरा उपविभागातील धनेरा या छोट्याशा गावात राहणारे मुरारी लाल मीना हे शेतात काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांना तीन मुलं आणि एक मुलगी आहे. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने कुटुंबावर कायमच कर्ज असायचे. 

कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी, मुरारी लाल मीना यांचा मोठा मुलगा पिंकेश उर्फ ​​प्रेम सिंह हा शिक्षणादरम्यान वडील आणि आई विमला यांच्यासोबत मजूर म्हणून काम करायला जात असे. पण पिंकेशने मजुरीचे काम करताना अभ्यास सोडला नाही आणि काहीतरी बनण्याचा निर्धार घेतला.

पिंकेश आणि त्याचे वडील मुरारी लाल यांनीही अनेक वर्षे खाणींमध्ये काम केलं. पण हिंमत न हारता अभ्यास सुरू ठेवला. याच काळात पिंकेशचे वडील मुरारी लाल गंभीर आजाराने आजारी पडले आणि कुटुंबात कमावणारे कोणी नव्हते. असे असूनही पिंकेशने हिंमत हारली नाही आणि वडिलांच्या उपचारासाठी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याला सावकारांकडून आणखी कर्ज घ्यावे लागले. कुटुंब कर्जात बुडाले आणि कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी पिंकेशच्या खांद्यावर आली.

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या तरुण पिंकेशने जिद्द आणि हिंमत कायम ठेवत बीए प्रथम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर, 2008 मध्ये, 6 व्या बटालियन आरएसीमध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी भरती झाली आणि तरुण पिंकेशने कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज केला. पिंकेशने मजुरीचे काम करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना कॉन्स्टेबल परीक्षेचीही तयारी केली. पण धाडस दाखवून तरुण पिंकेशची आरएसी कॉन्स्टेबल पदासाठी निवड झाली.

पिंकेशने 2011 मध्ये लग्न केले. पिंकेशचे वडील मुरारी लाल आजारपणामुळे उभे राहू शकले नाहीत तेव्हा पिंकेश यांनी त्यांचे दोन लहान भाऊ निर्मल आणि जनकराम यांच्यासोबत बहिणीला शिकवले आणि सावकारांचे कर्जही हळूहळू फेडले. दोन्ही भावांना नोकरी लागल्यावर आणि सावकारांचे कर्ज फेडल्यानंतर तरुण पिंकेशने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. 

2019 मध्ये जेव्हा कोरोना आला तेव्हा पिंकेशने यूट्यूब आणि पुस्तकांच्या माध्यमातून सेल्फ स्टडी सुरू केला आणि RPSC द्वारे घेतलेली पोलीस उपनिरीक्षक परीक्षा दिली. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, 21 सप्टेंबर 2023 रोजी निकाल लागला तेव्हा पिंकेशची  सब इन्स्पेक्टर म्हणून निवड झाली. पिंकेशची  सब इन्स्पेक्टर पदावर निवड झाल्यानंतर गावात सर्वांनाच आनंद झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: family drowned in debt worked laborer with father young man left jobs became sub inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.