फॅमिली फर्स्ट, पार्टी नेक्स्ट, नेशन लास्ट, हे काँग्रेसचं धोरण - अनुराग ठाकूर
By admin | Published: February 24, 2016 04:07 PM2016-02-24T16:07:44+5:302016-02-24T16:16:16+5:30
फॅमिली फर्स्ट, पार्टी नेक्स्ट, नेशन लास्ट, हे काँग्रेसचं धोरण असल्याची टिका भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत केली. ते लोकसभेत जेएनयूच्या प्रश्नावर सुरु असलेल्या चर्चेत बोलत होते.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - फॅमिली फर्स्ट, पार्टी नेक्स्ट, नेशन लास्ट, हे काँग्रेसचं धोरण असल्याची टिका भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत केली. ते लोकसभेत जेएनयूच्या प्रश्नावर सुरु असलेल्या चर्चेत बोलत होते. जेएनयूच्या प्रश्नावर काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांना त्यांनी सडेतोड उत्तर दिले.
देशासाठी शहीद झालेल्या जेएनयूच्या कॅप्टन पवन कुमार यांचा देशवासियांना अभिमान आहे. काही लोक जेएनयूला बदनाम करण्याचं षडयंत्र बनवत आहेत.
जेएनयूमध्ये 9 फेब्रुवारीला अफजल गुरुचा जयजयकार झाला, त्याला राहुल गांधींनी पाठिंबा दिला होता. अफजल गुरु कोण होता ? आतंकवादी होता का? अफझल गुरु शहीद होता का? असे प्रश्न त्यांनी लोकसभेत उपस्थित केले.
राहुल गांधी त्यांच्या आजोबांच नाव दिलेल्या विद्यापीठात जातात आणि देशविरोधी घोषणा देणा-यांच समर्थन करतात.देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसं म्हणायचं? डीएसयू संघटनेचा नक्षलवाद्यांशी संबंध हे यूपीएनेच जाहीर केलंय, मग त्यांना राहुल गांधींचा पाठिंबा का? असेही ते म्हणाले.
दरम्यान, लोकसभेत जेएनयूच्या प्रश्नावर सुरु असलेल्या चर्चेत सभागृहात दोन्ही पक्षाकडून सुरु असलेल्या गोंधळामुळे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी दोंन्ही बाजूस समज दिली व शांततेत काम करा असे सांगितले.