Nirbhaya Case : दोषींच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडे केली इच्छामृत्यूची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 03:19 PM2020-03-16T15:19:10+5:302020-03-16T15:20:40+5:30
दोषींच्या कुटुंबीयांनी पुढे म्हटले आहे, की असा कोणताही गुन्हा नाही, की ज्याला क्षमा केली जाऊ शकत नाही. यापूर्वीही देशातील मोठमोठ्या गुन्हेगारांना क्षमा देण्यात आली आहे. बदल्याची व्याख्या शक्ति नव्हे. क्षमा करणे हेच शक्तीचे सर्वात मोठे उदाहरण आहे.
नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. फाशीची शिक्षा ठोठावण्या आलेल्या चारही दोषिंच्या कुटुंबीयांनी आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून इच्छामृत्यूची मागणी केली आहे. इच्छामृत्यूची मागणी करणाऱ्यांमध्ये दोषींचे आई-वडील, भाऊ-बहीण आणि त्यांच्या मुलांचाही समावेश आहे.
दोषींच्या कुटुंबीयांनी या पत्रात म्हटले आहे, की आम्ही देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पीडितेच्या आई-वडिलांना विनंती करतो, की त्यांनी आमच्या विनंतीचा स्वीकार करून आम्हाला इच्छामृत्यूची परवानगी द्यावी. आम्हाल इच्छा मृत्यू दिल्यास भविष्यात होण्यारा कुठलाही गुन्हा रोखला जाऊ शकतो. आमच्या संपूर्ण कुटुंबाला इच्छामृत्यू दिल्यास भविष्यातही निर्भया सारखी दुसरी घटना रोखता येऊ शकते.
दोषींच्या कुटुंबीयांनी पुढे म्हटले आहे, की असा कोणताही गुन्हा नाही, की ज्याला क्षमा केली जाऊ शकत नाही. यापूर्वीही देशातील मोठमोठ्या गुन्हेगारांना क्षमा देण्यात आली आहे. बदल्याची व्याख्या शक्ति नव्हे. क्षमा करणे हेच शक्तीचे सर्वात मोठे उदाहरण आहे. निर्भया प्रकरणातील विनय शर्मा, अक्षय सिंह ठाकूर, पवन गुप्ता आणि मुकेश यांना 20 मार्चला सकाळी साडे पाच वाजता फासावर लटकवण्यात येणार आहे.
राष्ट्रपतींनी फेटाळली आहे सर्व दोषींची दया याची -
निर्भया प्रकरणातील सर्व दोषींनी आपली शिक्षा माफ व्हावी. यासाठी राष्ट्रपतींकडे दया याचिका सादर केली होती. त्यांची याचिका राष्ट्रपती कोविंद यांनी फेटाळून लावली आहे. मात्र, दोषी अक्षय सिंह ठाकूरने पुन्हा नवी दया याचिका केली आहे. यात त्याने पूर्वी केलेल्या याचिकेत काही गोष्टी नव्हत्या, असे म्हटले आहे.