आता प्रेमविवाह करण्यासाठी कुटुंबाची परवानगी आवश्यक?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 06:09 AM2024-02-20T06:09:01+5:302024-02-20T06:09:13+5:30
गुजरातच्या भूपेंद्र पटेल सरकारने प्रेमविवाहासाठी कुटुंबीयांची परवानगी अनिवार्य केली असल्याचा दावा करणारी एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
गुजरातच्या भूपेंद्र पटेल सरकारने प्रेमविवाहासाठी कुटुंबीयांची परवानगी अनिवार्य केली असल्याचा दावा करणारी एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. पोस्टनुसार प्रेमविवाह करण्यापूर्वी कुटुंबीयांची परवानगी घ्यावी लागणार असून, असा निर्णय घेणारे गुजरात हे देशातील पहिले राज्य बनले आहे.
आता कोणताही मुलगा अथवा मुलगी वडिलांना विचारल्याशिवाय लग्न करू शकत नाही, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मात्र, हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे समोर आले आहे. गुजरातने असा कोणताही कायदा अद्याप केलेला नाही. ३१ जुलै २०२३ रोजी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले होते की, प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य करण्याची तरतूद करता येईल का, याचा अभ्यास सरकार करेल. आजपर्यंत अशा कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्ट दिशाभूल करणाऱ्या आहेत.