आत्महत्येसाठी १२० किमी प्रवास; पुलावरून एकाचवेळी ५ जणांच्या उड्या, पण पुढे वेगळंच घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 06:01 PM2021-05-12T18:01:30+5:302021-05-12T18:02:09+5:30

कुटुंबप्रमुख इतर सदस्यांकडे दुर्लक्ष करत असल्यानं आई आणि चार मुलांची नदी पुलावरून उडी

Family Reached Prayagraj From Madhya Pradesh For Suicide | आत्महत्येसाठी १२० किमी प्रवास; पुलावरून एकाचवेळी ५ जणांच्या उड्या, पण पुढे वेगळंच घडलं

आत्महत्येसाठी १२० किमी प्रवास; पुलावरून एकाचवेळी ५ जणांच्या उड्या, पण पुढे वेगळंच घडलं

googlenewsNext

प्रयागराज: उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये असलेल्या एका पुलावरून एकाच कुटुंबातील ५ जणांनी नदीत उडी घेतली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी कुटुंबाला नदीत उडी मारताना पाहिलं. मात्र कोणी मदतीला पोहोचणार, त्याआधीच कुटुंबानं नदीत उड्या घेतल्या. मात्र पुलाखाली अनेक नाविक होते. त्यांनी बुडणाऱ्या कुटुंबाला वाचवलं. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि कुटुंबाला रुग्णालयात दाखल केलं. 

ज्याची कोरोना टेस्ट होतेय, 'तो' पॉझिटिव्ह येतोय; 'हा' जिल्हा सगळ्यांची चिंता वाढवतोय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातल्या रेवामधून कुटुंब १२० किलोमीटर अंतर कापून प्रयागराजला आलं होतं. कुटुंबातील पाच सदस्यांनी एकाचवेळी पुलावरून नदीत उडी घेतली. रोहिणी तिवारी यांनी त्यांची मुलगी रुपाली (२४), मनाली (२२), श्रेया (१८) आणि मुलगा अंश (१५) यांच्यासह नैनी पुलावरून आत्महत्या करण्याच्या हेतून पुलावरून उडी मारली. पुलाखाली असलेल्या नावाड्यांनी या संपूर्ण कुटुंबाला वाचवलं. रोहिणी आणि एका मुलीला गंभीर दुखापत झाली आहे. कौटुंबिक वादामुळे हे पाच जण आत्महत्या करण्यास प्रयागराजला आले होते. 

बाटलीत मूत आणि त्यानंच हात धू; सॅनिटायझर मागणाऱ्या कोरोना रुग्णाला अधिकाऱ्याचं उर्मट उत्तर

प्रयागराजमधील किडगंज पोलिसांनी आत्महत्या करण्यास आलेल्या कुटुंबियांची विचारपूस केली. आई रोहिणी आणि मुलगी रुपाली, मनालीनं सांगितलेलं आत्महत्येचं कारण एकसारखंच आहे. पती राधाकृष्ण तिवारी मुलांकडे दुर्लक्ष करून त्यांना शत्रूसारखी वागवत असल्याचं रोहिणी यांनी पोलिसांना सांगितलं. तर वडील मोठ्या भावाच्या कुटुंबाकडे पूर्ण लक्ष देतात. मात्र आमच्याकडे दुर्लक्ष करतात, असं रुपाली आणि मनालीनं पोलिसांना सांगितलं. वडिलांमुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे आम्ही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचंदेखील त्यांनी म्हटलं.

Web Title: Family Reached Prayagraj From Madhya Pradesh For Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.