छेडछाडीत जीव गमावलेल्या मुलीवर अंत्यसंस्कार करण्यास कुटुंबाचा नकार
By admin | Published: May 1, 2015 10:54 PM2015-05-01T22:54:40+5:302015-05-01T22:54:40+5:30
पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या कुटुंबाची मालकी असलेल्या कंपनीच्या धावत्या बसमधून छेड काढल्यानंतर फेकून देण्यात आलेल्या आणि
मोगा : पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या कुटुंबाची मालकी असलेल्या कंपनीच्या धावत्या बसमधून छेड काढल्यानंतर फेकून देण्यात आलेल्या आणि यातच मृत्यू झालेल्या मुलीवर अंत्यसंस्कार करण्यास तिच्या कुटुंबाने शुक्रवारी नकार दिला. पुरेशी नुकसानभरपाई मिळेपर्यंत आणि संबंधित बस कंपनीचा परवाना रद्द करेपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा कुटुंबाने घेतला.
पीडितेचे कुटुंबीय काँग्रेस, आम आदमी पार्टी तसेच विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत येथील स्थानिक रुग्णालयाबाहेर धरण्यावर बसले. याच रुग्णालयात मृत पीडितेच्या आईवर उपचार सुरू आहे. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मी माझ्या मुलीवर अंत्यसंस्कार करणार नाही, असे मृत पीडितेचे वडील सुखदेव सिंह म्हणाले. ५० लाख रुपये नुकसानभरपाई, कुटुंबातील एका सदस्यास नोकरी, जखमी पत्नीचा मोफत उपचार आणि संबंधित बस कंपनीचा परवाना रद्द करणे, अशा मागण्या त्यांनी यावेळी केला. फिरोजपूर क्षेत्राचे उपमहानिरीक्षक अमरसिंह चहल यांनी सुखदेव सिंह यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले.