घरच्यांनी नकार दिल्यामुळे दोघांनी जीवन संपवलं; आता त्यांचा पुतळा बनवून लावलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 15:37 IST2023-01-19T15:36:56+5:302023-01-19T15:37:36+5:30
ज्या लोकांनी त्या दोघांना वेगळं केलं, त्यांनीच मेल्यानंतर पुतळ्याचं लग्न लावलं

घरच्यांनी नकार दिल्यामुळे दोघांनी जीवन संपवलं; आता त्यांचा पुतळा बनवून लावलं लग्न
आज समाजात जाती-धर्माबद्दल मोठे बदल होऊनही काही लोक प्रेमविवाहाला गुन्हा मानतात. आजही अनेक राज्यात इतर जातीत प्रेमविवाह करण्यास मान्यता दिली जात नाही. अशावेळी काही जोडपे टोकाचं पाऊल उचलतात आणि आत्महत्या करात. असेच एक प्रकरण सध्या समोर आले आहे. घरच्यांनी नकार दिल्यानंतर प्रेमी युगुलाने आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर आता घरच्यांनी त्यांचा पुतळा बनवून लग्न लावलं आहे
दोघे हयात असताना घरच्यांनी लग्नाला परवानगी दिली नाही. यानंतर दोघांनी सोबतच मिठी मारुन गळाफास घेतला. त्या दोघांचे मृतदेह सोबतच लटकलेल्या अवस्थेत आढळले होते. यानंतर घरच्यांना त्या दोघांच प्रेम समजलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. गणेश आणि रंजना अशी या दोघांची नावे होती, त्यांनी सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. यानंतर आता त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून घरच्यांनी त्या दोघांचा पुतळा बनवून लग्न लावलं.
गणेशच्या एका नातेवाईकाने सांगितले की, गणेस आणि रंजनाचा पुतळा बनवून आदिवासी परंपरेनुसार त्या दोघांचा विवाह पार पडला. पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर विवाहसोहळा पार पडला. यावेळी परिसरातील अनेकजण या सोहळ्यात सामील झाले आणि त्या दोघांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.