पर्वतावर उपाशीपोटी अडकले होते कुटुंब, लष्कराने २४ तास चढाई करत पोहोचवले भोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 05:20 PM2021-05-17T17:20:28+5:302021-05-17T17:21:39+5:30

Indian Army News: भारतीय लष्कराचे जवान हे संकटसमयी देशातील सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी सदैव तयार असतात. याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला.

The family was starving on the mountain, the Indian army climbed 24 hours and delivered food | पर्वतावर उपाशीपोटी अडकले होते कुटुंब, लष्कराने २४ तास चढाई करत पोहोचवले भोजन

पर्वतावर उपाशीपोटी अडकले होते कुटुंब, लष्कराने २४ तास चढाई करत पोहोचवले भोजन

googlenewsNext

श्रीनगर - भारतीय लष्कराचे जवान हे संकटसमयी देशातील सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी सदैव तयार असतात. याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. (Indian Army News) जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या जवानांनी २४ तासांत ११ हजार फूट चढाई करत नागिनसूर पर्वत क्षेत्रात हिमवृष्टीमुळे अडकलेल्या.बकरवाल समुदायातील एका कुटुंबाला भोजन आणि मदत पोहोचवली. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने आज याबाबतची माहिती दिली आहे. (Indian Army provided relief to a Bakarwal family which was stranded in snow with shortage of food in the 11000 ft high Naginsur ridge)

लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, बशीर अहमद हे त्यांची पत्नी, तीन मुले आणि पाळीव प्राण्यांसह कथुआ येथून मारवाह पर्वतामधील नवापंछीच्या मार्गावर होते. हा समुदाय बर्फवृष्टीमुळे अन्नपदार्थ आणि प्राण्यांना चारा मिळावा यासाठी चाऱ्याच्या शोधात जातो. 

छतरू विभागात लष्कराच्या गुज्जर बकरवाल चौकीला फोन करून अहमदने मदतीची मागणी केली. त्यानंतर चिनगाम चौकीमधून बचाव पथक त्वरित रवाना झाले. त्यांनी सांगितले की, खराब हवामानादरम्यान सुमारे २४ तास चढाई करत जवान घटनास्थळावर दाखल झाले. त्यानंतर या कुटुंबाचा शोध घेत त्यांना भोजन, औषधे आणि आवश्यक सामुग्री पोहोचवली. 

लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, बकरवाल कुटुंबातील सदस्यांनी या मदतीसाठी लष्कराचे आभार मानले आहेत. तसेच दरवर्षी त्यांच्याकडील जनावरांचे कळप मारवाह पर्वतावर जाते. तसेच जेव्हा गरज भासते तेव्हा लष्कर मदतीसाठी धावून येते.

Web Title: The family was starving on the mountain, the Indian army climbed 24 hours and delivered food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.