जमावाच्या मारहाणीत कुटुंब झाले जखमी

By admin | Published: July 15, 2017 12:23 AM2017-07-15T00:23:31+5:302017-07-15T00:23:31+5:30

जुनैद या तरूणावर झालेल्या हल्ल्याचा प्रकार ताजा असतानाच, उत्तर प्रदेशातील मैनपुरीजवळही तशीच घटना घडली आहे.

Family wounded in mob assault | जमावाच्या मारहाणीत कुटुंब झाले जखमी

जमावाच्या मारहाणीत कुटुंब झाले जखमी

Next


आग्रा : रेल्वेमध्ये प्रवासादरम्यान जुनैद या तरूणावर झालेल्या हल्ल्याचा प्रकार ताजा असतानाच, उत्तर प्रदेशातील मैनपुरीजवळही तशीच घटना घडली आहे. शिकोहाबाद-कासगंज पॅसेंजरमध्ये एका कुटुंबावर जमावाने बुधवारी संध्याकाळी हा हल्ला केला. या हल्ल्यात कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि अपंग व्यक्तीला जमावाने मारहाण केली. कपड्यांवरून ते हिंदू नसल्याचे लक्षात आल्यावर कुटुंबाला लक्ष्य करण्यात आले. कुटुंबातील सर्व जखमींना फारूखाबादच्या राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. भोगावजवळ आम्ही ट्रेनमध्ये चढलो. गाडी जेमतेम ४ किलोमीटर पोहाचली, तोच एका इसमाने माझा मुलगा
फैजान याच्याकडून मोबाइल हिसकावून घेतला. फैजानने मोबाइल देण्यास विरोध करताच जमावाने त्याला मारहाण सुरू केली. कुटुंबातील इतर मध्ये पडले, तेव्हा जमावाने आमच्यासोबतच्या महिलांना शिवीगाळ सुरू केली.
या मारहाणीत कुटुंबातील ४ सदस्य गंभीर जखमी झाले असून त्यांना फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्या डोक्याला आणि पोटालाही मार लागला आहे, असे
५० वर्षीय मोहम्मद शाकिर यांनी म्हणाले.
जमावाला आमच्या दिशेने येताना पाहून आम्ही कंपार्टमेंटचा दरवाजा बंद करण्याता प्रयत्न केला, पण तोपर्यंत काही जण आत घुसले. बेशुद्ध होइपर्यंत त्यांनी आम्हाला मारहाण केल्याचे कुटुंबातील एकाने सांगितले. (वृत्तसंस्था)
>कपडेही फाटले
या कुटुंबातील महिलांच्या शरीरावरही मारहाणीच्या
खुणा आहेत. त्यांचे कपडेही फाटले होते, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Family wounded in mob assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.