प्रसिद्ध तेलगू दिग्दर्शक दासरी नारायण राव यांचे निधन

By admin | Published: May 30, 2017 09:37 PM2017-05-30T21:37:40+5:302017-05-30T21:46:40+5:30

प्रसिद्ध तेलगू दिग्दर्शक आणि माजी कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण राव यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 75 वर्षांचे होते.

Famous Telugu director Dasari Narayan Rao passes away | प्रसिद्ध तेलगू दिग्दर्शक दासरी नारायण राव यांचे निधन

प्रसिद्ध तेलगू दिग्दर्शक दासरी नारायण राव यांचे निधन

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30- प्रसिद्ध तेलगू दिग्दर्शक आणि माजी कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण राव यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. 
दासरी नारायण राव यांना गेल्या आठवड्यात हैदराबादमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते फुफ्फुस आणि किडणीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 
तेलगू, तमिळ आणि हिंदी भाषेतील 125 हून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन दासरी नारायण राव यांनी केले असून 50 हून अधिक चित्रपटांची निर्मिती सुद्धा त्यांनी केली होती. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांपैकी प्रेमाभिषेकम, मेघा संदेशाम, ओसे रामुलामा आणि टाटा मनावदु हे चित्रपट पडद्यावर खूप गाजले होते. तसेच,चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर आत्मचरित्र बनवण्याची घोषणा त्यांनी केली होती.
याचबरोबर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये दासरी नारायण राव यांनी कोळसा राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. मात्र, कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, दासरी नारायण राव यांच्या निधनाची बातमी समजताच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू, अभिनेते रजनीकांत, कमल हासन यांनी ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. 
 

Web Title: Famous Telugu director Dasari Narayan Rao passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.