पाकिस्तानात जितके दहशतवादी नाहीत, तेवढे आपल्याकडे देशद्रोही आहेत - तरुण सागर
By Admin | Published: June 30, 2017 01:50 PM2017-06-30T13:50:12+5:302017-06-30T14:16:57+5:30
पाकिस्तानमध्ये जितके दहशतवादी नाहीत, त्याहून जास्त देशद्रोही आपल्या देशात आहेत असं तरुण सागर यांनी केलं आहे
>ऑनलाइन लोकमत
सीकर (राजस्थान), दि. 30 - आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणारे प्रवचनकार जैन मुनी तरुण सागर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पाकिस्तानमध्ये जितके दहशतवादी नाहीत, त्याहून जास्त देशद्रोही आपल्या देशात आहेत असं तरुण सागर यांनी केलं आहे. प्रवचनकार जैन मुनी तरुण सागर यांनी राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात पिपराली येथे वैदिक आश्रमात पत्रकारांशी बातचीत करताना हे वक्तव्य केलं आहे.
तरुण सागर बोलले आहेत की, "देशात राहतात, देशाचं खातात आणि पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतात, मग अशी लोक देशद्रोही नाहीत तर मग कोण आहेत". जम्मू काश्मीरमध्ये वारंवार जवानांवर होणा-या दगडफेकीवर भाष्य करताना तरुण सागर यांनी हे वक्तव्य केलं आहे.
यावेळी तरुण सागर यांनी दहशतवादी हल्ल्यांवरही भाष्य केलं आहे. "दहशतवादी वाघाप्रमाणे समोरुन वार करत नाही, ते तर लांडग्याप्रमाणे मागून हल्ला करतात", असं तरुण सागर बोलले आहेत.
यावेळी तरुण सागर यांनी देशातील गरिबीवरही भाष्य केलं. "लोक म्हणतात भारत गरीब देश आहे, पण भारत गरीब देश नाही. मला वाटतं देशात गरीबी नाही तर असामनता आहे", असं स्पष्ट मत तरुण सागर यांनी व्यक्त केलं आहे.
आपल्या बेधडक वक्तव्यं आणि प्रवचनांवरही यावेळी प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तरुण सागर यांनी सांगितलं की, "कडूपणा माझ्या प्रवचनांमध्ये नाही, तर समाज आणि लोकांच्या आपापसताली संबंधांमध्ये आहे. यामुळे माझी प्रवचने बेधडक वाटू शकतात".
याआधी एकदा संगीतकार विशाल ददलानी याने तरुण सागर यांच्याबद्दल वादग्रस्त टि्वट केलं होतं ज्यासाठी त्याला माफी मागावी लागली होती. ददलानी यांनी तरुण सागर महाराजांबाबत आक्षेपार्ह ट्विट केले होते व त्यामुळे वाद उफाळला होता.
ददलानी तरुण सागर महाराजांच्या येथील आश्रमात गेले णि ‘पंच माफी’ या जैन समाजाच्या परंपरेप्रमाणे क्षमा मागितली. ददलानी यांच्या क्षमायाचनेनंतर जैन साधू त्यांना म्हणाले होते की, मी तुम्हाला आधीच माफ केले आहे. तुम्ही जैन समाजाची क्षमा मागावी तसेच ट्विटरवरील ट्विट डीलीट करून हा विषय संपल्याचे जाहीर करावे. तरुण सागर महाराजांनी गेल्या महिन्यात हरियाणा विधानसभेत भाषण केले होते. त्यानंतर ददलानी यांनी त्यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याने वाद उफाळला होता.