आज जुन्या संसदेला निरोप, नव्यात प्रवेश; PM, MP, उपराष्ट्रपती, लोकसभाध्यक्ष साक्षीला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 08:25 AM2023-09-19T08:25:46+5:302023-09-19T08:26:03+5:30

सकाळी ९:३० पासून जुन्या संसदेत सर्व खासदारांसोबत छायाचित्रे काढली जातील.

Farewell to the old Parliament today, enter the new; PM, MP, Vice President, Lok Sabha Speaker Sakshila | आज जुन्या संसदेला निरोप, नव्यात प्रवेश; PM, MP, उपराष्ट्रपती, लोकसभाध्यक्ष साक्षीला

आज जुन्या संसदेला निरोप, नव्यात प्रवेश; PM, MP, उपराष्ट्रपती, लोकसभाध्यक्ष साक्षीला

googlenewsNext

संजय शर्मा 

नवी दिल्ली : गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर नव्या संसदेतसंसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी जुन्या संसदेच्या आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे. ब्रिटिश काळापासून चालत आलेल्या संसदेला निरोप देण्याची वेळ आता आली आहे. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर मंगळवारी नवीन संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संसदेतील सर्व खासदार, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि अध्यक्ष ओम बिरला फोटो सेशन करतील. हा फोटो जुन्या संसदेच्या निरोप समारंभाचा असेल जो एक ऐतिहासिक क्षण असेल. 

सकाळी ९:३० पासून जुन्या संसदेत सर्व खासदारांसोबत छायाचित्रे काढली जातील.त्यासाठी त्यांना लवकर बोलावण्यात आले आहे.  यानंतर सकाळी जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांची संयुक्त बैठक होईल. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला आणि मल्लिकार्जुन खरगे यांचे निरोपाचे भाषण होणार आहे. भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास जुन्या संसदेशीही जोडला गेला आहे. संसदीय परंपरा आणि लोकशाही मूल्यांचे पालन करत स्वतंत्र भारताची ७५ वर्षे या जुन्या संसदेत गेली. स्वतंत्र भारताची राज्यघटनाही इथेच तयार झाली. देश चालविण्यासाठी कायदेही इथूनच बनवले गेले. 

नवीन ड्रेस कोड 
नव्या संसदेतील प्रवेशाबरोबरच आजपासून खासदारांचा गणवेशही बदलणार आहे. मंगळवारपासूनच सर्व खासदारांना गुलाबी रंगाचा कमळाच्या फुलांचा शर्ट, खाकी पॅन्ट आणि जॅकेट परिधान करावे लागणार आहे.  

पक्ष कार्यालये कधी?
संसदेतील सर्व राजकीय पक्षांना अद्याप कार्यालयीन खोल्यांचे वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे या विशेष अधिवेशनात कोणत्याही राजकीय पक्षाचे संसदीय कार्यालय नवीन संसदेत स्थलांतरित केले जाणार नाही. आता विशेष अधिवेशनानंतर राजकीय पक्षांची कार्यालये संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी नव्या संसदेत स्थलांतरित होऊ शकतील.

मीडिया कक्ष हटविले 
जुन्या संसदेतील गेट क्रमांक १२ आणि गेट क्रमांक ४ समोर उभारलेले मीडिया कक्ष हटविण्यात आले आहेत. नवीन संसदेबाहेर मीडिया कक्ष अजून बनवलेले नाहीत. सध्या माध्यमांसाठी तंबूची व्यवस्था करण्यात आली आहे. 

सेंट्रल हॉल नसेल 
नव्या संसदेत खासदारांना चर्चा करण्यासाठी आणि भेटण्यासाठी जागा नसेल. सेंट्रल हॉलमध्ये सर्व पक्षांचे खासदार आपापसात चर्चा करत असत. माध्यमातील लोकही याच गप्पागोष्टीत सामील होत असत. हा सेंट्रल हॉल नेहमीच स्मरणात राहील.

Web Title: Farewell to the old Parliament today, enter the new; PM, MP, Vice President, Lok Sabha Speaker Sakshila

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Parliamentसंसद