वडिलांचं निधन, कमावणारं कोणीच नाही; 'तिने' हार नाही मानली, रिक्षा चालवून भरते कुटुंबाचं पोट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 04:22 PM2024-08-12T16:22:13+5:302024-08-12T16:32:05+5:30
सोनालीही रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे.
हरियाणाच्या फरिदाबादमध्ये रस्त्यावर एक मुलगी रिक्षा चालवते. परिस्थितीमुळे तिला हे काम करावं लागत आहे. मदतीसाठी इतरांसमोर हात पसरण्यापेक्षा कष्ट करून पैसे कमावणं चांगलं असल्याचं ती म्हणते. तिला हे काम करण्यात कोणत्याही प्रकारची लाज वाटत नाही. मुलीने सांगितलं की, वडिलांच्या निधनामुळे घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावली होती, त्यानंतर तिने रिक्षाचं स्टेअरिंग हाती घेतलं आहे.
आजच्या काळात मुलीही कोणापेक्षा कमी नाहीत. त्या सर्व कामं करू शकतात. त्याचप्रमाणे फरिदाबादमध्ये सोनालीही रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. सोनालीने सांगितलं की, ती उत्तर प्रदेशची रहिवासी आहे, जी अनेक वर्षांपासून फरीदाबादमध्ये राहते. ती २० वर्षांची आहे. वडिलांच्या निधनानंतर तिने घराची जबाबदारी घेतली.
सोनालीने दिलेल्या माहितीनुसार, तिला तीन लहान बहिणी आहेत. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तिला रिक्षा चालवावी लागते. ती फरिदाबादमध्ये रिक्षा चालवते. भीक मागण्यापेक्षा कष्ट करणं नेहमीच चांगलं आहे. या कामात कसलीही लाज नाही. भीक मागायला लाज वाटते. कोणतंही काम करा, कामाची कमतरता नाही, ते करण्यासाठी इच्छा हवी. रिक्षा चालवून मी दररोज ५०० ते ७०० रुपये कमावते, ज्याद्वारे मी माझ्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यास सक्षम आहे.
आजकाल स्पर्धा जास्त आहे. फरिदाबादमध्ये अनेक रिक्षाचालक आहेत. अनेक वेळा असे घडते की राईड्स कमी मिळतात. निराश होऊन घरी जावे लागते. पण, मला लाज वाटत नाही असं म्हटलं आहे. महिलांना संदेश देताना सोनाली म्हणाली की, काम करण्यात कधीही लाज वाटता कामा नये. कठोर परिश्रम करा, तुम्हाला परिणाम दिसेल. जीवनात फक्त कठोर परिश्रम आवश्यक आहेत.