"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही?", केजरीवालांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 08:34 PM2020-12-02T20:34:45+5:302020-12-02T20:38:32+5:30

Arvind Kejriwal And Amrinder Singh Over Farmers Protest : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

farm laws farmer protest delhi cm arvind kejriwal hits out at punjab cm captain amrinder singh | "अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही?", केजरीवालांचा सवाल

"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही?", केजरीवालांचा सवाल

Next

नवी दिल्ली - केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घ्यावा. अशी मागणी शेतकरी करीत आहेत. यासाठी गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याच दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांवरून आमनेसामने आले आहेत. दिल्ली सरकारने लागू केलेले कृषी कायदे हे शेतकरीविरोधी असल्याचं म्हटलं आहे. यावरून अरविंद केजरीवाल यांनी आता कॅप्टन अमरिंदर सिंह यांना जोरदार उत्तर दिलं आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना कृषी विधेयकं रोखण्यासाठी अनेकदा संधी आली होती. मग त्यावेळी अमरिंदर सिंग यांनी ही विधेयकं का रोखली नाहीत? असा सवाल पंजाबची जनता करत असल्याचं म्हटलं आहे. तसेच अमरिंदर सिंह हे केंद्र सरकारच्या समितीवर होते. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी समितीमध्ये असताना त्यावेळी या काळ्या कायद्यांना विरोध का केला नाही. त्यांनी तेव्हा ती का रोखली नाहीत? असं देखील म्हटलं आहे. 

राष्ट्रपतींनी ज्या दिवशी कृषी विधेयकांवर स्वाक्षरी केली तेव्हा त्यांचं कायद्यात रुपांतर झालं. हे कायदे रोखण्याची ताकद कोणत्याही राज्यात नाही. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हे सर्व माहीत होतं तर मग त्यांनी आपल्यावर खोटे आरोप का केले? असा सवाल केजरीवाल यांनी केला आहे. यासोबतच आम्हाला या विषयावर राजकारण करायचं नाही. होऊही देणार नाही. केंद्र सरकारने शेतकर्‍यांची मागणी मान्य करावी आणि एमएसपीवर लेखी हमी द्यावी, अशी मागणी केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

"आंदोलन करणारे अनेकजण शेतकरी वाटत नाही"; केंद्रीय मंत्र्यांचं विधान

शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असतानाच केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी या शेतकरी आंदोलनातील अनेकजण शेतकरी वाटत नसल्याचं म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामागे विरोधी पक्षाचा हात असल्याचा आरोप केंद्रीय मंत्र्यांनी केला आहे. व्ही. के. सिंह यांनी केलेल्या या विधानामुळे शेतकरी आंदोलनावरुन राजकीय वातावरण तापणार असल्याचं सध्या चिन्ह दिसत आहे. "फोटोमधील अनेकजण शेतकरी वाटत नाहीत. जे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे तेच सरकारने केलं आहे. शेतकऱ्यांना कृषी कायद्याची काहीच अडचण नाही. ज्यांना आहे ते शेतकरी नसून इतर लोकं आहेत. या आंदोलनामागे विरोधी पक्षांबरोबरच कमिशन मिळणाऱ्या लोकांचाही हात आहे" असं व्ही. के. सिंह यांनी म्हटलं आहे. 

"झूठ की, लूट की, सूट-बूट की सरकार; मित्रांचं उत्पन्न झालं चौपट, शेतकऱ्यांचं मात्र अर्ध" 

काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा एक व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी बुधवारी (2 डिसेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "झूठ की, लूट की, सूट-बूट की सरकार" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. "शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार असं सांगितलं गेलं. पण मित्रांचं उत्पन्न चौपट केलं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न अर्ध होणार. खोटं बोलणारं, लूटणारं आणि सूट-बूट वालं हे सरकार आहे" असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा एक व्हिडीओ देखील शेअर करत सरकारवर जोरदार निशाणा साधला.

Web Title: farm laws farmer protest delhi cm arvind kejriwal hits out at punjab cm captain amrinder singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.