टोमॅटोच्या शेतीतून शेतकऱ्याने वर्षभरात कमावले 7 कोटी; परदेशातील नोकरी सोडून लेकाची साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 04:11 PM2023-03-27T16:11:28+5:302023-03-27T16:12:18+5:30

शेतकऱ्याचा इंजिनियर मुलगा परदेशातील नोकरी सोडून भारतात परतला आणि आता वडिलांना मदत करत आहे.

farmer earned rs 7 crore in year by cultivating tomatoes | टोमॅटोच्या शेतीतून शेतकऱ्याने वर्षभरात कमावले 7 कोटी; परदेशातील नोकरी सोडून लेकाची साथ

टोमॅटोच्या शेतीतून शेतकऱ्याने वर्षभरात कमावले 7 कोटी; परदेशातील नोकरी सोडून लेकाची साथ

googlenewsNext

मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात एक प्रेरणादायी घटना घडली आहे. येथे एक शेतकरी टोमॅटोची शेती करून करोडपती झाला. एका वर्षात तब्बल 7 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. शेतीची एवढी भरभराट झाली की, शेतकऱ्याचा इंजिनियर मुलगा परदेशातील नोकरी सोडून भारतात परतला आणि आता वडिलांना मदत करत आहे.  टोमॅटो विकून करोडोंची कमाई करणारा एक शेतकरी आहे. आता संपूर्ण नर्मदापुरम विभागात त्याला टोमॅटो किंग या नावाने ओळखले जात आहे. 

मधुसूदन धाकड असे त्यांचे नाव आहे. गेल्या वर्षी 2022 च्या अखेरीस त्यांनी टोमॅटो विकून 7 कोटींहून अधिक उत्पन्न मिळवले. 70 एकरात टोमॅटोची लागवड करून प्रत्येक एकर 10 लाख रुपये नफा कमावला. मधू धाकड यांनी जिल्ह्यातील टोमॅटो इतर राज्यात तसेच देशाबाहेर पाठवल्याचे कृषी अधिकारी सांगतात. मधू यांनी शेतीला फायदेशीर व्यवसाय करून पंतप्रधान मोदींचे स्वप्न साकार केले. त्यांनी फक्त आठवीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. कमी शिकलेले असल्यामुळे त्याला सुरुवातीच्या काळात खूप अडचणींचा सामना करावा लागला. 

उत्पादनानंतर पीक विक्रीच्या समस्येसह अनेक समस्या होत्या. 15 वर्षांपूर्वी 20 एकरांपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज 180 एकरांवर पोहोचला आहे. मधु धाकड हे 70 एकरात टोमॅटोची लागवड करतात. याशिवाय सिमला मिरची या पिकांचीही लागवड केली जात आहे. यंदा टोमॅटोचे भाव कमी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र गेल्यावर्षी 2022 मध्ये त्यांनी 70 एकरात टोमॅटोची लागवड करून योग्य भाव मिळवून एकरी 10 लाखांचा नफा मिळवला.

वडिलांचे शेतीचे काम इतके बहरले की त्यांचा मुलगा निमेश धाकड, जो दुबईत मर्चंट नेव्हीमध्ये काम करत होता, तो घरी परतला आहे. निमेश वडिलांना तांत्रिक आणि आधुनिक पद्धतीने शेती करण्यात मदत करत आहे. बाजारपेठ शोधल्यानंतर आम्ही पिकांना चांगला भाव मिळेल तेथे पाठवतो. जम्मू-काश्मीर, कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्र, दिल्ली आणि देशाबाहेरच्या लोकांनीही हरदाच्या टोमॅटोची चव चाखली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मधु धाकड हे आदर्श आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ते शेतीला फायदेशीर व्यवसाय बनवत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: farmer earned rs 7 crore in year by cultivating tomatoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.