शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारने सुरू केलीय खास योजना, 90 टक्क्यांपर्यंत मिळेल अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 04:32 PM2023-02-23T16:32:26+5:302023-02-23T16:32:54+5:30

पीएम किसान योजना, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये सन्मान निधी म्हणून दिले जातात.

farmer get 90 percent subsidy on pm kusum yojana govt schemes | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारने सुरू केलीय खास योजना, 90 टक्क्यांपर्यंत मिळेल अनुदान

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारने सुरू केलीय खास योजना, 90 टक्क्यांपर्यंत मिळेल अनुदान

googlenewsNext

नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने 1-2 नव्हे तर अनेक योजना राबविल्या आहेत. ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना अनेक सुविधा मिळतात. यामध्ये पीएम किसान योजना, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये सन्मान निधी म्हणून दिले जातात. याशिवाय, कृषी यंत्रावर सब्सिडी, खतांवर सब्सिडी अशा अनेक योजना आहेत, ज्यांचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. यापैकी एक म्हणजे पीएम कुसुम योजना (PM Kusum Scheme). 

याअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना सोलर पंप बसवण्याची सुविधा देते. ही योजना 2019 मध्ये सुरू झाली होती. दरम्यान, शेतकरी शेतात पाणी देण्यासाठी इलेक्ट्रिक ट्यूबवेल वापरतात. ज्यामध्ये त्यांचा खर्च वाढतो. सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन त्यांना कमी खर्चात चांगल्या सुविधा मिळू शकतात. पीएम कुसुम योजनेंतर्गत, शेतकरी सौरऊर्जेचा वापर करून कमी खर्चात चांगले पीक घेऊ शकतात. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या जमिनीवर सौर पॅनेल बसवण्यासाठी सरकारकडून मदत मिळते.

कशी मिळवू शकता 90 टक्के सब्सिडी? 
तुम्हाला सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आम्ही तुम्हाला याचा फायदा कसा घेऊ शकता, याबद्दल सांगत आहोत. या योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना 60 टक्क्यांपर्यंत सब्सिडी देतात.  तसेच, 30 टक्के बँकेद्वारे कर्ज घेऊ शकतात. जेणेकरून अधिकाधिक शेतकरी आपल्या शेतात सौरपंपाद्वारे सिंचन करू शकतील.

कसा करायचा अर्ज?
तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाइट https://www.india.gov.in/ वर जाऊन योजनेचा ऑनलाइन फॉर्म भरू शकता. ऑनलाइन नोंदणी फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला आवश्यक माहिती द्यावी लागेल, जसे की आधार कार्डसह जमिनीची कागदपत्रे, एक घोषणापत्र, बँक खात्याची माहिती, इत्यादी.

पीएम किसानचा लाभ घेण्यासाठी 'हे' काम करा
याशिवाय, जर तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत 13 व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला 10 फेब्रुवारीपर्यंत तुमच्या बँक खात्याचे ई-केवायसी व्हेरिफिकेशन करावे लागेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, होळीपूर्वी 13 वा हप्ता लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे.

Web Title: farmer get 90 percent subsidy on pm kusum yojana govt schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी