भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 01:03 PM2024-04-30T13:03:30+5:302024-04-30T13:04:28+5:30
एका शेतकऱ्याचं नशीब फळफळलं आहे. फक्त 210 रुपयांमध्ये तब्बल दहा लाखांची नवीन कार मिळाली आहे.
एका शेतकऱ्याचं नशीब फळफळलं आहे. फक्त 210 रुपयांमध्ये तब्बल दहा लाखांची नवीन कार मिळाली आहे. झारखंडच्या गोड्डा येथे असलेल्या नायरा पेट्रोल पंपाने बिहारमधील भागलपूरमधील एकचरी येथील शेतकरी नीरज कुमार सिंह यांना ही मोठी भेट दिली आहे. ही बाब जेव्हा शेतकऱ्याला समजली तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. सुरुवातीला त्याचा विश्वास बसला नाही.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नीरज यांनी नायरा पेट्रोल पंपावरून बाईकमध्ये 210 रुपयांचे पेट्रोल भरले होते. त्यावेळी कंपनीतर्फे एक स्कीम चालवली जात होती. स्कीमनुसार लकी ड्रॉचे कूपन भरले जात होते. पेट्रोल भरल्यानंतर नीरज यांनीही कुपन भरलं आणि घरी आले. मार्चमध्ये लकी ड्रॉ काढण्यात आला तेव्हा नीरज यांचं नाव विजेते म्हणून पुढे आले. हुंडईची वेन्यू कार त्यांना कंपनीकडून भेट म्हणून देण्यात आली होती. गाडी मिळाल्यानंतर नीरज यांना खूप आनंद झाला.
कार विजेते नीरज यांनी सांगितलं की, ते खरकपूर एकचारी गावात शेती करणारे शेतकरी आहेत. डिसेंबरमध्ये ते काही वैयक्तिक कामानिमित्त गोड्डा येथील हनवरा येथे गेले होते. हनवारा येथील नायरा पेट्रोल पंपावर त्यांनी 210 रुपयांचे पेट्रोल भरले होते. यानंतर त्यांना काही दिवसांपूर्वी अचानक फोन आला की ते कार विजेते आहेत. सुरुवातीला त्यांना सायबर फ्रॉड वाटलं आणि कॉल बंद केला, पण पुन्हा फोन आल्यावर ते पेट्रोल पंपावर पोहोचले. काही कागदपत्रांनंतर, कंपनीने एक हुंडई वेन्यू कार दिली.
पेट्रोल पंपाच्या मालकाने सांगितले की, डिसेंबर महिन्यातच कंपनीने लकी ड्रॉ आयोजित केला होता, ज्यामध्ये ग्राहकांना किमान 100 रुपयांचे पेट्रोल खरेदी करण्यासाठी कूपन देण्यात आले होते. यामध्ये या शेतकऱ्याने 210 रुपयांचे पेट्रोलचे कूपन भरून या लकी ड्रॉ लॉटरीत कार जिंकली. या लकी ड्रॉमध्ये कंपनीकडून 6 लोकांना कार देण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये नीरज कुमार सिंह यांना ही कार मिळाली आहे. न्यूज 18 हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे.